२ सप्टेंबरच्या देशव्यापी संपात बंदर - गोदी कामगारांचाही सहभाग - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२ सप्टेंबरच्या देशव्यापी संपात बंदर - गोदी कामगारांचाही सहभाग

Share This
मुंबई : कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली भांडवलदारांना सोयीचे आणि कामगारांसाठी अन्यायकारक बदल करणार्‍या केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरुद्ध येत्या २ सप्टेंबर रोजी भारतातील प्रमुख बंदरांतील सर्व बंदर व गोदी कामगार संपावर जाणार असल्याची माहिती ऑल इंडिया पोर्ट अँण्ड डॉक वर्कर्स फेडरेशन(वर्कर्स)चे अध्यक्ष अँड़ एस. के. शेट्ये यांनी दिली आहे.
भारतातील प्रमुख १२ बंदरांतील बंदर व गोदी कामगारांच्या पाच मान्यताप्राप्त फेडरेशनची बैठक ८ आणि ९ ऑगस्ट रोजी चेन्नई येथे झाली होती. त्या बैठकीमध्ये २ सप्टेंबर रोजीचा देशव्यापी संप यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व युनियनने १७ ऑगस्ट रोजी व्यवस्थापनास तशी नोटीस दिली आहे. केंद्र सरकारने भारतातील प्रमुख बंदरांचे कॉर्पोरेटायझेशन (कंपनीकरण) करू नये, बंदरातील कायमस्वरूपाची कामे कंत्राटी पद्धतीने देऊ नयेत. कामगार कायद्यात मालकधाजिर्णे बदल करू नयेत, गोदी कामगारांच्या वेतन कराराची पूर्ण अंमलबजावणी करणे अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

सरकारच्या या कामगारविरोधी धोरणांचा निषेध करून कामगार कायद्यातील दुरु स्त्या मागे घेण्यात याव्यात, यासाठी देशातील अकरा केंद्रीय कामगार संघटनांनी २ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप पुकारलेला आहे. या संपात मुंबई बंदरातील सर्व कामगार संघटना सहभागी होणार असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अँण्ड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages