शून्य कचरा मोहीम राबवणार्‍या सोसायट्यांना मालमत्ता करात सवलत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शून्य कचरा मोहीम राबवणार्‍या सोसायट्यांना मालमत्ता करात सवलत

Share This

मुंबई : 'शून्य कचरा मोहीम राबवणार्‍या निवासी सोसायट्यांना महापालिका मालमत्ता करात सवलत देणार आहे. ही मोहीम यशस्वी राबवणार्‍या सोसायट्यांना 'स्वच्छ संकुल, हरित संकुल' प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. मात्र ही सवलत किती टक्के द्यावी, याचा निर्णय पालिकेने अजून घेतलेला नाही. 
मुंबई निवासी इमारती आणि संकुलांतून दररोज ३0 टक्के कचरा जमा होतो. सध्या मुंबईत कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची समस्या उद्भवली आहे. सोसायट्यांतून निर्माण होणार्‍या कचर्‍याला आळा घालण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शून्य कचरा मोहीम राबवणार्‍या सोसायट्यांना मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेची मदत न घेता सोसायट्यांना ही योजना राबवावी लागणार आहे. ओला, सुका कचर्‍याचे वर्गीकरण, प्रत्येक घरातील कचर्‍याचे संकलन करून त्याचे वर्गीकरण करावे, कचर्‍याचे सामाईक वर्गीकरण सोसायटीच्या आवारातच करावे लागणार, गांडूळ खत, बायोगॅस, वीजनिर्मिती करणे, सेंद्रीय खतनिर्मिती करावी आणि जैविक कचर्‍याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, निकष पूर्ण करणार्‍या सर्व खाजगी आणि स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे, या कचर्‍याची भंगारवाला आणि रद्दीवाल्याकडे विक्री करता येईल.

ही योजना राबवताना प्रस्तावात इमारतीमधील फ्लॅट आणि रहिवाशांची संख्या नमूद करावी लागेल, कचर्‍याच्या निर्मितीस्थळावर वर्गीकरणाचा तपशील देणे बंधनकारक असून, ओल्या जैविक कचर्‍यावर प्रक्रि येचा तपशील द्यावा लागेल, ओल्या व सुक्या कचर्‍याचे संकलन केल्याचा आणि त्याची विल्हेवाट लावल्याचा दैनंदिन तपशील द्यावा लागेल.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages