मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात गेल्या वर्षी तुलनेत यंदा पाणी मोठय़ा प्रमाणात कमी आहे त्यामुळे मुंबईकर नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने ज्या जलजोडण्या बांधकाम धारकांना बांधकाम करण्यासाठी देण्यात आल्या आहेत त्या पूर्ण पणे खंडीत करण्यात याव्यात अशी मागणी पालिका र-थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी आज पालिका अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रा बरोबर मुंबई शहरामध्ये सन 2014 च्या तुलनेत आजपर्यंत सरासरी पेक्षा अतिशय कमी पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाण्याच्या पातळी मध्ये दिवसेंदिवस घट होत चालली आहे त्यामुळे मुंबईकर नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार का अशी मोठी भीती निर्माण झाली आहे सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातील तूट पाहता सुरक्षिततेचा उपाय म्हणून पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये २० टक्के कपात करण्यात आली आहे व ही कपात सर्व प्रकारच्या निवासी , औद्योगिक व व्यापारी जलजोडणीधारकाना लागू करण्यात आली आहे या शिवाय मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा वापर करणारे औद्योगिक व जलजोडणी धारक यांना होणारा पाणीपुरवठा 50 टक्क्यांपयॅत नियंत्रित करण्यात आले आहे परंतु ज्या जलजोडण्या बांधकाम धारकांना बांधकाम करण्यासाठी देण्यात आल्या आहेत त्या पूर्ण पणे खंडीत करण्यात याव्यात अशी मागणी पालिका र-थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी पालिका अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे केली आहे
