महिला स्वच्छतागृहात शुल्क आकारण्यात येणार नसल्याची घोषणाच राहिली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महिला स्वच्छतागृहात शुल्क आकारण्यात येणार नसल्याची घोषणाच राहिली

Share This
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर यापुढे बांधण्यात येणार्‍या महिला स्वच्छतागृहात कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याची घोषणा मध्य रेल्वे प्रशासनाकडून तीन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, अद्यापि ती घोषणाच राहिली आहे.
महिला प्रवाशांना नि:शुल्क प्रसाधनगृहांची सुविधा देण्याबाबत २0१२च्या ऑक्टोबरमध्ये मध्य रेल्वे प्रशासनाने घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर काहीच हालचाली झालेल्या नाहीत. ना नवीन स्वच्छतागृह, ना मोफत सेवा देण्यात आली. त्यामुळे जुन्याच स्वच्छतागृहांचा वापर करताना महिलांना शुल्क द्यावेच लागत आहे.रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत मध्य रेल्वेचे माजी महाव्यवस्थापक सुबोधकुमार जैन यांच्याशी मुंबईतील खासदारांची ऑक्टोबर २0१२ बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये नव्या महिला स्वच्छतागृहांत कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, अशी एकमुखी मागणी सर्व खासदारांनी केली होती. ती महाव्यवस्थापकांनी मान्य केली होती; परंतु त्यानंतर आजपर्यंत त्याबाबतीत काहीही हालचाली होताना दिसल्या नाहीत. महिलांना जुन्याच अस्वच्छ प्रसाधनगृहांचा वापर शुल्क देऊन करावा लागत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages