लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या--रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या--रामदास आठवले

Share This
सांगली १ / ८ / २०१५ - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना  भारतरत्न हा सर्वोच्च किताब देवून त्यांनी साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या ऐतिहासिक योगदानाबद्दल सन्मान करण्यात यावा अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली. अण्णाभाऊ साठेंच्या जन्मगावी वाटेगाव येथे त्यांचा 95 वा जयंती उत्सव आज साजरा झाला त्यात आठवले  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी वाटेगाव आणि मुंबईत अण्णाभाऊ साठेंचे स्मारक उभारावे. शासनाने त्यासाठी 200 कोटींची तरतूद करावी अशी मागणी आठवलें यांनी केली. वाटेगाव येथे अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी आपल्या खासदारनिधीतून 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा रामदास आठवलें यांनी केली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages