इतर नागरिकांना बेस्टकडून अवघड वाहन चालनाचा सराव करून देण्याचा निर्णय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

इतर नागरिकांना बेस्टकडून अवघड वाहन चालनाचा सराव करून देण्याचा निर्णय

Share This
मुंबई : बेस्ट प्रशासनाने आपल्या वरिष्ठ चालकांकडून इतर नागरिकांना अवघड वाहन चालनाचा सराव करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बेस्ट उपक्रमाला महसूल मिळणार असून, चांगल्या आणि अनुभवी चालकांकडून सामान्य नागरिकांना वाहतुकीचे धडे मिळण्यास मदत होणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक प्रशिक्षण केंद्र, दिंडोशी येथे इतर नागरिकांसाठी अवजड वाहन चालन सराव योजना प्रशिक्षण शुल्क आकारुन राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ सर्व नागरिक घेऊ शकतात. अवघड वाहन चालन सराव प्रशिक्षण घेण्यास उत्सुक असणार्‍या उमेदवाराकडे अवजड वाहन चालन शिकाऊ परवाना अथवा पक्के अवजड वाहन चालन परवाना असणे आवश्यक आहे. संपूर्ण प्रशिक्षण कालावधी २१ दिवस असला तरी आवश्यकतेनुसार प्रशिक्षण क ालावधी कमी-जास्त करण्याची सुविधा तसेच प्रशिक्षण क ालावधीप्रमाणे प्रशिक्षण शुल्क भरण्याची संधी बेस्टतर्फे देण्यात आली आहे. बेस्टच्या ज्येष्ठ चालक शिक्षकांद्वारे संपूर्ण मुंबई शहरामध्ये अवजड वाहन चालवण्याचा सरावदेखील घेण्यात येणार आहे.

मोटर वाहन क ायद्यानुसार रस्ता वाहतूक व सुरक्षितता नियम, वाहतूक संकेत, रस्त्यावरील खुणा यांची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. तसेच अपघात विरहित सुरक्षित वाहन चालक पद्धती, इंधन बचत यावर उपक्रमाच्या अधिकार्‍यांची व्याख्याने, तज्ञ अभियांत्रिकी अभियंत्याद्वारे वाहनाबाबत कट मॉडेलवर माहिती व व्याख्यान देण्यात येणार आहे. २१ दिवसांच्या यशस्वी प्रशिक्षणानंतर उपक्रमाचे अवजड वाहन चालन प्रशिक्षण प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. २१ दिवसांच्या प्रशिक्षणाचे शुल्क ५२५0 रुपये तर प्रतिदिन प्रशिक्षण शुल्क २५0 रुपये आकारण्यात येणार आहे. सोमवार ते शनिवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बेस्ट वाहतूक प्रशिक्षण केंद्र. दिंडोशी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), संपर्क क्रमांक -२८४0५६४५ या क्रमांकावर इच्छुकांनी संपर्क साधायचा आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages