अनधिकृतपणे दगडमाती टाकणाऱयांना शोधून देणाऱया नागरिकांना महापालिका देणार बक्षीस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अनधिकृतपणे दगडमाती टाकणाऱयांना शोधून देणाऱया नागरिकांना महापालिका देणार बक्षीस

Share This
बृहन्मुंबई महानगरपालिका परिसर हद्दीतील विभागात रात्रीच्या वेळेस डम्पर मालकांकडून अनधिकृतपणे दगडमाती टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.  विभागातील कर्मचाऱयांना अशा प्रकारे दगडमाती टाकणाऱया डम्पर मालकांना शोधून काढण्यास कठीण जात आहे. अनधिकृतपणे दगडमाती टाकणाऱया डम्पर मालकांना प्रतिबंध करण्यासाठी अशा प्रकारची वाहने महानगरपालिका रस्त्यांवर दगडमाती टाकताना / रिकामी करतेवेळी दिनांक, वेळ व स्थळासहित छायाचित्र काढून माहिती देणाऱयास बक्षीस देण्याचे महापालिका प्रशासनाने घोषित केले आहे.

माहिती देणाऱयांनी सादर केलेल्या छायाचित्रामध्ये वाहन क्रमांक वाचनीय असेल, असे छायाचित्र काढून, ज्या जागेवर छायाचित्र काढले आहे ती जागा ओळखण्यासाठी जवळपासचे / रस्त्यावरचे क्षेत्र (landmark) स्पष्टपणे दिसेल असे छायाचित्र पाठवावे. माहिती देणाऱयांनी काढलेले छायाचित्र हे प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) यांचा कार्यालयीन ई-मेल आयडीdebrisalert@gmail.com वर सादर करणे आवश्यक आहे.

प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे, जर का कोणी असे करताना दोषी आढळल्यास नि त्याबाबतची छायाचित्रासहची माहिती देणाऱयास रुपये १०,०००/- (रुपये दहा हजार) एवढा पुरस्कार देण्यात येईल. अशा प्राप्त झालेल्या माहितीबद्दल पुरस्कार प्रदान करण्याच्या योग्यतेबाबतचा निर्णय घेण्यास प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) हे परिपूर्ण अधिकारी असतील. ते त्यांचा निर्णय, माहिती देणाऱयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित विभाग अधिकाऱयांकडून त्याबाबतची खातरजमा करुनच घेतील.

अशा प्रकारची माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) त्या डम्पर मालकाचा शोध / संपूर्णतः माहिती घेतल्यानंतर त्या डम्पर मालकाला रुपये २०,०००/- एवढा दंड आकारला जाईल. जर त्या डम्पर मालकाने दंड भरण्यास नकार दिला तर महानगर दंडाधिकारी न्यायालयात त्या डम्पर मालकाविरुद्ध मनपा नियमावलीनुसार कलम ३६८ सहित कलम ४७१ अन्वये कारवाई करण्यात येईल.  नागरिकांनी जागरुक राहून याबाबतीत सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages