गणेशोत्सव मंडळाना पोलिस, ट्रॅफिकची परवानगी मिळ्यानंतरच पालिकेची परवानगी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गणेशोत्सव मंडळाना पोलिस, ट्रॅफिकची परवानगी मिळ्यानंतरच पालिकेची परवानगी

Share This

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) - :   सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवाआधी ३० दिवसांच्या आत परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र ही अट पालिकेने शिथिल केली आहे. मात्र मंडळांनी पोलिस व वाहतूक विभागाची परवानगी घेतल्यानंतरच पालिकेची परवानगी मिळणार आहे. ही परवानगी मिळाल्याशिवाय मंड‌ळाना मंडप उभारता येणार नाही. दरम्यान, पालिकेने पॉलिशी व परवानगीसाठीचा अर्ज संकेतस्थळावर प्रसिद्ध केला असून मंड‌ळांनी नियमानुसार परवानगी घ्यावी असे पालिकेकडून कळवण्यात आले आहे.



गणेशोत्सवाला जेमतेम तीन आठवडे उरले आहेत. आतापर्यंत फक्त गृहनिर्माण सोसायट्यांनी परवानगी घेतली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वाहतूक व पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतर मंडप उभारण्यासाठी पालिका परवानगी देणार आहे. गुरुवारी मुंबईतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंड‌ळांसोबत पालिकेने घेतलेल्या बैठकीत उत्सवाबाबत आढावा घेण्यात आला. न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेने उत्सवाबाबत केलेल्या पॉलिसीनुसार मंड‌ळाना परवानगी घेणे बंधनकारक आहे. उत्सवा दरम्यान वाहतुकीला व पादचाऱ्यांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी मंडळांनी घ्यावी लागणार आहे. पालिकेने ठरवलेल्या पॉलिसीबाबत सार्वजनिक मंड‌ळ‌ समाधानी असून त्यानुसार उत्सव साजरा केला जाईल, असे मंड‌ळांनी यावेळी मान्य केले. मंडळांनी मंडपाच्या दर्शनीभागात परवानगी मिळाल्याचे पत्र ठळकपणे दिसेल असे लावावे. मंडपाची उंची, लाऊडस्पिकरचा आवाजाची मर्यादा ठरल्याप्रमाणे ठेवणे बंधनकारक आहे. मंडपामुळे पादचारी रस्ता बदलला असेल तर तशाप्रकारचा दिशा दर्शवणारा अॅरो लावावा. अशा प्रकारच्या महत्वाच्या अटी मंड‌ळांनी पाळाव्यात अशा सूचना पालिकेने दिल्या.
२८ ऑगस्टपर्यंत पालिका खड्डे बुजवणारगणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे पालिका बुजवणार असल्याचे पालिकेने मंडळाना सांगितले. दरम्यान मंडप उभारण्यासाठी मंड‌ळांनी रस्त्यावर खड्डे पाडल्यास  पालिका २ हजार रु दंड आकारणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages