टॅबची स्वप्ने दाखवणे शिवसेनेचा पब्लिसिटी स्टंट - संजय निरुपम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

टॅबची स्वप्ने दाखवणे शिवसेनेचा पब्लिसिटी स्टंट - संजय निरुपम

Share This
मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने विद्यार्थ्यांना टॅब देण्याचे स्वप्न दाखवणे म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहेअशी टीका मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.

महापालिकेच्या बाराशे शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे. विद्यार्थ्यांना वाचता व लिहिता येत नाहीअशा या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची विदारक अवस्था आहे. गेल्या बावीस वर्षांपासून महापालिकेच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेला याकडे पाहण्यास वेळ मिळत नाहीमात्र टॅब साठी लॉबिंग करण्यास त्यांना बरोबर वेळ मिळतोअसा टोला संजय निरुपम यांनी लगावला. 
महापालिका शाळेत शिकणार्‍या साडेचार लाख विदयार्थ्यांना आधी प्राथमिक सुविधा पुरवा व नंतर टॅबच्या मागे लागा असे ते म्हणाले.  टॅबचा तमाशा करण्याऐवजी महापालिका व महापालिकेच्या शाळा व्यवस्थित चालवण्याची खरी गरज असल्याचे निरुपम यांनी सांगितले. 
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत आहेही घट रोखण्याकडे शिवसेनेने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच व्हर्च्युअल क्लास चा डांगोरा पिटण्याऐवजी सध्या त्याची काय दुरवस्था झाली आहे तिकडे लक्ष द्या असे निरुपम म्हणाले

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages