ब. मो. पुरंदरे िवरोधातील मोहीम चालूच राहणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ब. मो. पुरंदरे िवरोधातील मोहीम चालूच राहणार

Share This
मुंबई / प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस सरकारने ब. मो. पुरंदरे यांना ह्यमहाराष्ट्रभूषणह्ण दिला असला तरी आमची विचारांची लढाई थांबणार नाही. यापुढे राज्यभर आम्ही पुरंदरे आिण सरकारविरोधी िनषेध सभा घेणार आहोत. त्याची सुुरवात ठाण्यातील ३० ऑगस्टच्या निषेध सभेचे होणार असल्याचे संभाजी िब्रगेडने स्पष्ट केले आहे. 


महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान झाल्यानंतर हा वाद संपुष्टात येईल असे वाटत होते. परंतु, संभाजी िब्रगेडने पुरंदरेविरोधी मोहीम कायम ठेवण्याचा िनर्णय जाहीर केला आहे. ह्यसनातनी वृत्तीचे लोक पुरंदरे यांचे उदात्तीकरण करत आहेत. पुरंदरे यांच्या िवकृत इतिहासलेखनासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी आम्ही िनषेध सभा घेणार आहोत, असे िवद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी सांगितले. 

पुरंदरे िवरोधी िनषेध सभांची सुरुवात ३० ऑगस्ट रोजी ठाण्यातून होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, चित्रलेखाचे संपादक  ज्ञानेश महाराव, विचारवंत प्रा. प्रतिमा परदेशी त्यात बोलणार आहेत. जिथे-जिथे ब. मो. पुरंदरे यांचा सत्कार होईल ; तिथे तिथे आमच्या निषेध सभा होतील, असे संभाजी िब्रगेडने स्पष्ट केले आहे. 


पुरंदरे यांचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार रद्द करावा, या मागणीसाठी १८ पुरोगामी संघटनांनी ह्यछत्रपती िशवाजी महाराजा बदनामीिवरोधी कृती समितीह्ण स्थापन केली होती. या समितीने राज्यातील २२ िजल्ह्यात गेल्या तीन महिनयात शेकडो िशवसन्मान जागर परिषदा घेतल्या. त्यापेक्षा अिधक संख्येने निषेधसभा घेण्याचे आमचे िनयोजन आहे, असे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले आहे.

राडा होणार?सांगली येथील िशवसन्मान जागर परिषदेवेळी पुरंदरे समर्थकांनी या परिषदेवर हल्ला केला होता. पोलिसासमक्ष दोन्ही बाजूंनी तुंबळ हाणामारी झाली होती.संभाजी िब्रगेडला आता राष्ट्रवादीची साथ िमळाल्याने निषेध सभांवेळी पश्चिम महाराष्ट्रात िनषेध सभांवेळी अनेक ठिकाणी राडा होण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages