प्रवाशी वाढल्याने मध्य रेल्वेवर ३५ नव्या लोकल गाड्यांची गरज - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रवाशी वाढल्याने मध्य रेल्वेवर ३५ नव्या लोकल गाड्यांची गरज

Share This
मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांची संख्या मोठय़ा प्रमाणात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मध्य रेल्वे मार्गावर सुमारे ३५ हजार प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या वाढत्या प्रवासी संख्येला सामावून घेण्यासाठी मध्य रेल्वेला आणखी ३५ नव्या लोकलची आवश्यकता आहे. 

मध्य रेल्वे मार्गावर दररोज सुमारे ४0 लाख, तर पश्‍चिम रेल्वेवर सुमारे ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. एकूण ७५ लाख प्रवासी दररोज उपनगरीय मार्गावर प्रवास करतात. मध्य रेल्वेवर हार्बर मार्गावरील मानखुर्द, वाशीसारख्या स्थानक परिसरातील लोकसंख्या गेल्या काही वर्षात मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. ठाण्याच्या पुढेही कर्जत-कसारा पट्टय़ातील प्रवासीदेखील वाढले आहेत. त्यामुळे हार्बर आणि मेन लाईनवर प्रचंड ताण येतो आहे. मध्य रेल्वे मार्गावर दिवसाला लोकलच्या १६१८ फेर्‍या चालवल्या जातात. त्यापैकी हार्बर मार्गावर ५८३, ट्रान्सहार्बर मार्गावर २१0 फेर्‍या आणि मेन लाईनवर दररोज ८२५ फेर्‍या चालवण्यात येतात. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कर्जत-कसारा पट्टय़ातील लोकसंख्या वाढीमुळे आणखी ३५ नव्या लोकलची आवश्यकता आहे. एका लोकलच्या दिवसाला सुमारे १२ फेर्‍या चालवण्यात येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत वाढलेल्या जवळपास ३0 हजार नव्या प्रवाशांसाठी आणखी ४२0 फेर्‍या चालवण्याची आवश्यकता असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages