दरकरार पद्धतच हळूहळू बंद करण्याचा निर्णय
मुंबई : शासनाची खरेदी पद्धती अधिक पारदर्शक करताना दरकरार पद्धतच हळूहळू बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. दरकरार पद्धत मोडीत काढण्याच्या दिशेने पाऊल टाकत असल्यामुळे सरकारने सध्याच्या दरकरारांचे नूतनीकरण करण्यात आले नाही, असेही त्यांनी सांगितले. मात्र, एमएमआरडीए तसेच मुंबई महापालिकेच्या कारभारावर श्वेतपत्रिका काढण्याची विरोधी पक्षाची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. सुनील तटकरे यांनी ही मागणी केली होती. कोणी विशिष्ट प्रकल्पाबाबत आकडेवारी मागितल्यास त्यांना ती दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या वर्षाच्या तुलनेत सर्व प्रमुख प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली असल्याची आकडेवारी जाहीर करत गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाणही वाढले आहे. सध्या तपासाचे प्रमाण ३२.६ टक्के झाले असून ते ५0 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महिलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये मात्र वाढ झाल्याचे दिसत असून गुन्हे नोंदीची, संबंधित व्याख्येची व्याप्ती वाढल्यामुळे हे प्रमाण वाढले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकर्यांना पकडण्याच्या प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात प्रगती झाली असून लवकरच त्यांचे मारेकरी पकडले जातील, असेही त्यांनी सांगितले.
पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी झालेल्या शासकीय पूजेच्या वेळी जिल्हाधिकार्यांनी आपल्याला ताटकळत ठेवले हा गैरसमज असून आपण निर्धारित वेळेलाच पूजा केली. येथील यात्रेच्या वेळी यात्रेकरूने धरलेली लोखंडी पताका वर विजेच्या प्रवाहित तारेला लागल्यामुळे त्याला झटका लागला आणि त्याने पताका सोडली व पळ काढला. त्यामुळे अनेकांनी पळापळ केली व चेंगराचेंगरी झाली. यात जखमी झालेल्या लोकांना मदत जाहीर करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
फेसबुक आणि व्हॉट्सअँपच्या माध्यमातून होणार्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी सायबर सेल अधिक सक्षम करण्याचे काम सुरू आहे. यात एक हजार जणांचा समावेश असणार आहे. मालवणी दारुकांडाच्या पार्श्वभूमीवर आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी कायद्यातही बदल करण्याचा आमचा मानस असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुंबईच्या किनारा मार्गाचे प्रारूप वेबसाईटवर टाकण्यात आले असून त्यावर लोकांच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.