बेकायदा कत्तलखान्यांवर पालिका कारवाई करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेकायदा कत्तलखान्यांवर पालिका कारवाई करणार

Share This

मुंबई : बकरी ईदनिमित्त मुंबईत बेकायदेशीररीत्या उभारल्या जाणार्‍या कत्तलखान्यांविरोधात शिवसेना-भाजपचे सदस्य बुधवारी स्थायी समितीच्या सभेत आक्रमक झाले. हे अनधिकृत कत्तलखाने तात्काळ हटवावेत, अशी मागणी सत्ताधारी सदस्यांनी केली. सत्ताधारी सदस्य आक्रमक झाल्याने या बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एस. श्रीनिवास यांनी दिले.
बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृहात तात्पुरते शेड उभारण्याचा प्रस्ताव समितीच्या सभेत मांडण्यात आला. यासाठी २ कोटी ३३ लाख २२ हजार रुपये खर्च येणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी यावर बोलताना बकरी अड्डा येथील उदाहरण दिले. 'या विभागात तो समाज नसतानाही तेथे भररस्त्यात बकरे कापले जातात. शिवाय राजरोसपणे कत्तलखाने उभारण्यात येत असल्याने या अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रहाटे यांनी केली. दरवर्षी देवनारला शेड उभारण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्याची आवश्यकता काय, कायमस्वरूपी शेड का उभारल्या जात नाहीत, अशी विचारणा सुधीर जाधव यांनी केली. तर भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनीही बेकायदा कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली. यावर काँग्रेसच्या नगरसेविका वकारून्नीसा अन्सारी यांनी बोलताना मुंबईत मांसाहारींचे प्रमाण वाढले असून गोहत्या बंदीमुळे बकर्‍यांच्या कत्तलीचे प्रमाण वाढल्याचे सांगितले. गोहत्या बंदी विधेयक आणून तुम्ही आता आमच्या खाण्यावरही बंदी आणली आहे, असा आरोप त्यांनी केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages