सीएनजी पंपचालकांचा २१ ऑगस्टला संप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सीएनजी पंपचालकांचा २१ ऑगस्टला संप

Share This
मुंबई : मुंबई, ठाणे आणि रायगडमधील सीएनजी पंपचालक शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत. तेल कंपन्यांकडून सीएनजी विक्रीचे कमिशन अद्याप मिळाले नसल्यामुळे लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. या एक दिवसाच्या संपामध्ये मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील १७0 सीएनजी पंपचालक सहभागी होणार असल्यामुळे सीएनजी वाहनचालकांचे हाल होण्याची शक्यता आहे. मात्र या संपातून पेट्रोल, डिझेल इंधन वगळण्यात आले आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून येणारा सीएनजी गॅस हा तेल कंपन्यांद्वारे पेट्रोल पंपावर येतो. सीएनजी गॅसच्या एक किलो विक्री मागे पेट्रोल पंपचालकांना ३२ पैसे कमिशन मिळते. मात्र मागील अडीच वर्षांपासून हे कमिशन १४ पैसे मिळत आहे. उर्वरित थकित कमिशनसाठी तेल कंपन्यांसोबत वारंवार बैठका घेण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरदेखील कोणतेच समाधानकारक उत्तर तेल कंपन्यांच्या वतीने न मिळाल्यामुळे हा एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला असल्याचे मुंबई पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages