खोट्या नोटांमुळे बेस्टला ३ लाख ४६ हजार रुपयांचा तोटा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खोट्या नोटांमुळे बेस्टला ३ लाख ४६ हजार रुपयांचा तोटा

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
बेस्ट प्रशासनाकडे परिवहन विभागाचे उत्पन्न दर दिवशी आयसीआयसीआय, बँक ऑफ इंडिया आणि सिटी बँक मध्ये जमा केले जाते. या जमा केल्या जाणाऱ्या उत्पन्नामध्ये जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१३ या दरम्यान ३ लाख ४६ हजार ५५० रुपयांच्या खोट्या नोटा आढळल्या आहेत. बेस्टकडे आलेल्या या खोट्या नोटांमुळे बेस्ट प्रशासनाला साडे तीन लाख रुपयांचा घाटा झाला आहे.

आयसीआयसीआय बँकेमध्ये एक हजार, ५०० व १०० रुपयांच्या २ लाख १० हजार ७५० रुपयांच्या तर बस पास विक्रीमधून १ लाख ७६ हजार ३०० रुपयांच्या नोटा बनावट आढळल्या आहेत. त्यापैकी पास धारकांकडून ४० हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले असून उर्वरित १ लाख ३५ हजार ८०० रुपये वसुल करता आलेले नाहीत. यामुळे बेस्टला ३ लाख ४६ हजार ५५० रुपयांचा तोटा झाला आहे. या बनावट चलनी नोटा बँकांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्याबदल्यात बेस्टला तशी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. बेस्टकडे आलेल्या या बनावट नोटा प्रवाश्यांकडून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. या बनावट नोटांची  जबाबदारी उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांवर टाकणे अवघड असल्याने हि रक्कम निर्लेखित करावी असा प्रस्ताव बेस्ट समिती पुढे सादर झाला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages