मुंबई 24 August ( प्रतिनिधी ) - : मुंबई महापालिकेच्या शालेय पोषण आहारांतर्गत बचत गटाना देण्यात आलेले ३९ धनादेश वटले नसून त्यात पालिका अधिकाऱ्यांच्या सहीचे एकाच नंबरचे दोन धनादेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवारी शिक्षण समिती सभेत भाजपच्या नगरसेविका राजश्री शिरवळकर यांनी हरकरतीचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाला धारेवर धरले. या मुद्द्याची चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली.
शालेय पोषण आहारांतर्गत महिला बचत गटाला ७ जुलै रोजी १२९८८१ क्रमांकांचा धनादेश दिला. संबंधित बचत गटाने स्टेट बँकेत धनादेश जमा केले. याचवेळी इतर बचत गटांनीही आपले धनादेश जमा केले होते. धनादेश क्लिअरींगला गेले तेव्हा केशर व राजश्री महिला बचत गटांना दिलेले एकाच नंबरचे दोन धनादेश असल्याचे बँकेच्या लक्षात आल्यावर आठवडाभरात म्हणजे १५ जुलै रोजी राजश्री महिला बचत गटाला बँकेतून फोन आला त्यांनी एकाच नंबरचे दोन धनादेश असल्याचे लक्षात आणून दिले. त्यानंतर या प्रकरणी १६ जुलैला प्रशासनाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र त्यानंतर आतापर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नसल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले. ५५९ धनादेशपैकी ३९ धनादेश का वटले नाहीत. केशर बचत गटाला ८२ हजारचा व राजश्री बचत गटाला १४ लाख रुपयाचा धनादेश पालिकेने दिला होता. हे एकाच नंबरचे धनादेश वटले नाहीतच पण त्यासोबतचे ३८ धनादेशही बाऊन्स झाले. हे नेमके प्रकरण काय आहे? एकच नंबर असलेल्या धनादेशवर अधिकाऱ्यांने सही कशी केली, त्याबाबतचा प्रशासनाने खुलासा करून दोषींवर त्वरीत कारवाई करावी असे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष रितू तावडे यांनी प्रशासनाला दिले.