मुंबई - १९ ऑगस्ट २०१५
मुंबईच्या प्रारूप आराखड्यास सहा महिने मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावावर आज विरोधकांवर आक्षेप उठविण्यात आले. या संदर्भात आयुक्तांनी प्रथम खुलासा करावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली . यावर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सदस्यांच्या सूचनांची आयुक्तांनी दाखल घ्यावी असे सांगत गटनेत्यांच्या बैठकीत यावर आयुक्तांकडून स्पष्टीकरण करण्यास सांगू असे सांगत सदर प्रस्ताव मंजूर केला.
सदर विषयाला वाचा फोडताना कॉंगेस चे प्रवीण छेडा यांनी विकासकांसाठी विकास आराखडा हंग करून ठेवला असल्याचा आरोप करत थेट मातोश्रीला लक्ष करण्याचा प्रयत्न केल्याने फणसे यांनी छेडा यांना पुढे बोलण्यास मनाई केलि . त्यानंतर मनसेचे सुधीर जाधव यांनी सदर विकास आराखड्यात मागच्यासारख्या चुका होवू नयेत तसेच हा मराठीत असावा अशी मागणी केली .
त्याचप्रमाणे जुना विकास आराखडा रद्द का झाला याचा खुलासा व्हावा , यातून भ्रष्ट अधिकार्यांना बाजूला करून नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी जाधव यांनी केलि. तर कोन्ग्रेस चे आरिफ झकेरिया यांनी यावर आयुक्तांनी निवेदन करण्याची गरज असल्याचे सांगत यापूर्वी सल्लागारांवर खर्च केलेल्या पैशांचे काय असा सवाल केला . राष्ट्रवादी चे गटनेते धनंजय पिसाळ यांनी यापूर्वी खर्च झालेले करोडो रुपये संभदीत अधिकाऱ्यांकडून वसूल करावी अशी मागणी केली, तसेच या कामात नगरसेवकांना विश्वासात घावे अशी सूचनाही पिसाळ यांनी यावेळी केलि.
कोन्ग्रेस च्या नगरसेविका वकारुन्निसा यांनी यावरून सत्ताधार्यांना धारेवर धरीत मिठी नदीचा विकास न करणारे मुंबईच्या विकास कसा करणार असा सवाल केला . सभागृहात आजपर्यंत पूर्वीचे फोटा लावले गेले नहित. विकास आराखड्याबाबत कोणतेही सादरीकरण झालेले नसल्याचेही त्यांनी सांगितले . तर म न से गटनेते संदीप देशपांडे यांनी १९६६ चे १५४ कलम काय आहेत याचा खुलासा करावा यामध्ये केवळ चुकांची दुरुस्ती मनसून संपूर्ण डी सी आर बदलणार आहे का पूर्ण आराखडा रद्द करण्याचा अधिकार सदर कलमानुसार आहे का असे सवाल करीत नक्की काय केले जाणार ते स्पष्ट झाले पाहिजे अशी मागणी केलि. तर विरीधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी यापूर्वीच्या सूचना , हरकतींबाबत काय करणार ते स्पष्ट करा अशी मागणी केलि.
सत्ताधारी पक्षाकडून भ ज प चे गटनेते मनोज कोटक यांनी काँग्रेसला टार्गेट करीत मिठी नदिच्या आड येणाऱ्या काँग्रेस आमदारावर तोंडसुख घेत सी एस टी रोड वरुन राहण्यास हेच महाशय जबाबदार असल्याचा आरोप केला तर सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी पहिल्या चुकीच्या विकास अराखाद्याबद्दल उद्धव ठाकरेंच प्रथम आवाज उधविल्याचे सांगत या विषयावर नगरसेवकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
