मुंबई : ग्राहकांच्या सोयी सुविधेसाठी आता महावितरणनेही अद्ययावत तंत्रज्ञानाचा मार्ग अवलंबत महावितरणचेही मोबाइल अँप उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या अँपचे गुरुवारी उद््घाटन करण्यात आले आहे. या अँपच्या माध्यमातून वीज बिल भरण्यापासून ते कॉल सेंटरला तक्रार करण्यापर्यंतच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ग्राहकाने आपल्या मोबाइल क्रमांकावर एकदा या अँपवर नोंदणी केल्यास या ग्राहकांला परत नव्याने नोंदणी करण्याची गरज राहणार नाही.
महाराष्ट्रात सर्वत्र महावितरणच्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी महावितरणकडून सातत्याने नवनवीन उपाय योजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महावितरने मोबाइल अँप तयार केले आहे. ग्राहकांना त्यांचे वीज बिल पाहता तसेच भरता येणार आहे. मोबाइल अँपद्वारे क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगच्या वापर करून ग्राहक वीज बिल भरू शकतात. याशिवाय या अँपमध्ये ग्राहकांना वीजसेवेबाबत तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून तक्रार नोंदवण्यासाठी ग्राहकांना ग्राहक क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच या तक्रारीची पोच ग्राहकांना तक्रार क्रमांकासह एमएमएसद्वारे मिळणार आहे. या अँपद्वारे महावितरणच्या १८00२३३३४३५, १८00२00३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर कॉल करता येईल. या अँपमध्ये ग्राहकांना महावितरणशी संबंधित सेवांची चौकशी करता येईल व सूचना करता येईल. महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरून गुगल प्ले स्टोर्सवरून हे अँप डाऊनलोड करता येईल.