नायर रुग्णालयात ९ महिन्यांच्या चिमुरडीचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नायर रुग्णालयात ९ महिन्यांच्या चिमुरडीचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू

Share This
मुंबई : मुंबईत साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. यामध्ये लेप्टो आणि स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू पावणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. नायर रुग्णालयात ९ महिन्यांच्या चिमुरडीचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे.परिणामी जुलै महिन्यात स्वाईन फ्ल्यू बळींची संख्या ८ वर येऊन पोहचली आहे.  जानेवारी महिन्यापासून स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू पावणार्‍यांची संख्या २८ आहे.

जून महिन्यात लेप्टोची व्यापक प्रमाणावर पसरली होती. खासकरून उत्तर उपनगरात लेप्टोचे सर्वाधिक रूग्ण आढळून आले होते. पालिकेने खबरदारीचे उपाय हाती घेतल्यामुळे लेप्टो आवाक्यात आला असताना स्वाईन फ्ल्यूची साथ पसरली . लेप्टोचे जुलै महिन्यातच ७५ प्रकरणे आढळून आली असून मृत्यू पावणार्‍यांची संख्या १६ आहे. त्यातुलनेत स्वाईन फ्ल्यूची साथ झपाट्याने पसरत आहे. केवळ जुलै मन्यिातच स्वाईन फ्ल्यूचे १९५ रूग्ण आढळून आले आहे. यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला आहे. भायखळा येथे राहणार्‍या ९ महिन्यांच्या चिमुरडीस ताप आल्यामुळे नायर रूग्णालयात २५ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते ; परंतु दुसर्‍या दिवशी तिला स्वाईन फ्ल्यूचे निदान झाले. वैद्यकीय उपचार सुरू असतानाच तिचा गुरूवारी मृत्यू झाला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages