बाबासाहेबांचे लंडनमधील घर १० दिवसांत खरेदी करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बाबासाहेबांचे लंडनमधील घर १० दिवसांत खरेदी करणार

Share This

मुंबई, दि. २४ (प्रतिनिधी)-लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या निवासस्थानाची खरेदी राज्य सरकार येत्या १० दिवसांत पूर्ण करील अशी हमी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

बडोले यांनी सांगितले की, बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी प्रक्रिया येत्या ४ सप्टेंबरपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारमार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. घरमालकाने सरकारला अल्टीमेटम देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे सांगत परराष्ट्र उच्चायुक्तांमार्फत राज्याचा सामाजिक न्याय विभाग या घर खरेदीची रक्कम देणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. बडोले आज दिवसभर दिल्लीत होते. या सर्व प्रकरणात ते जातीने लक्ष घालत होते. दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील बडोले यांच्या केबिनबाहेर निदर्शने केली. पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
घर खरेदी प्रकियेला विलंब लागत असल्याने घरमालकाने सोमवारीची अंतिम मुदत दिली होती. सरकारकडून या घराचे मूल्यांकन करण्यात आले आहे. एका मूल्यांकनात घराची किंमत २९कोटी ९०लाख तर दुसर्‍या मूल्यांकनात ती ३०कोटी इतकी आहे. घरमालकाने ३१कोटी रुपये मागितले आहेत. राज्य सरकार व घरमालक यांच्यात चर्चा सुरू आहे.
बाबासाहेबांचे लंडनमधील घर १० दिवसांत खरेदी करणार

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages