उपनगर लोकल विकास प्रकल्प धूळ खात पडले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उपनगर लोकल विकास प्रकल्प धूळ खात पडले

Share This
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढू लागली आहे. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पात अनेक प्रकल्प राबवण्याची घोषणा होते; परंतु ते प्रकल्प सत्यात उतरण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. मुंबईतील उपनगर लोकल विकास प्रकल्पासाठी केलेल्या कित्येक घोषणा अनेक वर्षांनंतरही प्रत्यक्षात सुरू झालेल्या नाहीत. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी) अंतर्गत जाहीर झालेल्या प्रकल्पांची मुदत क ागदावर के व्हाच संपुष्टात आली आहे. प्रत्यक्षात त्यातील अनेक प्रकल्प धूळ खात पडले आहेत.

उपनगरीय लोकल विकासासाठी मुंबई रेल विकास महामंडळाची (एमआरव्हीसी)स्वतंत्र निर्मिती करण्यात आली आहे. या महामंडळाने तीन टप्प्यांमध्ये लोकल विकासाचा आराखडा तयार केला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील कुर्ला-ठाणे पाचवा-सहावा रेल्वे मार्ग, बोरिवली-विरार चौपदरीकरण, डीसी-एसी विद्युतप्रवाह परिवर्तन अशा प्रकल्पांचा समावेश होता. त्यातील बहुतांश प्रकल्प पूर्ण झाले आहेत. मात्र, दुसर्‍या टप्प्यातील प्रकल्पांचे नियोजन अद्यापि पूर्ण झालेले नसल्याने तिसर्‍या टप्प्यातील घोषणा प्रत्यक्षात के व्हा येणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दुसर्‍या टप्प्यातील बोरिवली ते मुंबई सेंट्रलपर्यंत सहावा मार्ग, अंधेरी ते गोरेगावपर्यंत हार्बर मार्गाचा विस्तार, सीएसटी ते ठाण्यापर्यंत डीसी-एसी विद्युतप्रवाह परिवर्तनाचा समावेश झाला. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी परळ टर्मिनस उभारण्याचे स्वप्न दाखवले होते. ओशिवरा स्टेशन सहा वर्षांपासून क ार्यान्वित होण्याच्या वाटेवर आहे. त्याचप्रमाणे बोरिवली-मुंबई सेंट्रल सहावी रेल्वे लाइन रखडलेली आहे. हे प्रकल्प रखडल्याने त्यांची किंमतही दुपटीवर गेली आहे. हार्बर मार्गावरील ९ डब्यांच्या लोकल १२ डब्यांपर्यंत करण्यापासून ते अंधेरी-गोरेगावपर्यंतचा विस्तारही रखडला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages