दिलीप पटेल यांचे नगरसेवक पद शाबूत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दिलीप पटेल यांचे नगरसेवक पद शाबूत

Share This
मुंबई,शुक्रवार (प्रतिनिधी) : भाजपचे माजी गटनेते जेष्ठ नगरसेवक  दिलीप पटेल यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय आज  पालिका सभागृहात महापौर  स्नेहल आंबेकर यांनी मागे घेतल्याची घोषणा केल्याने दिलीप पटेल यांचे नगरसेवक  पदाला मान्यता मिळाली आहे. यामुळे पटेल हे पुन्हा नगरसेवक म्हणून  सक्रिय होऊ शकतील.

पालिका अतिरिक्त  आयुक्तांच्या १० जून २०१५ च्या अधिसुचनेद्वारे सहा. निवडणूक व नगरशुल्क अधिकारी यांनी दिनांक ७ ऑगस्ट २०१५ चे पत्र क्र-निवडणूक/८०८/सा अन्वये दिलीप पटेल यांच्या नगरसेवक पदाच्या नीरर्हतेबाबत कळविण्यानुसार महानगरपालिकेच्या दिनांक १० ऑगस्ट २०१५ च्या सभेत दिलीप पटेल यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची घोषणा महापौरांनी पालिका सभेत  केली होती. मात्र, पालिकेच्या उप-कायदा अधिकारी यांनी २७ ऑगस्ट २०१५ चा क्र.एलसीटी/९३६९ अन्वये मागे घेण्या संबंधात कळविल्यानुसार मागे घेण्याचा निर्णय आज महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका सभागृहात घोषित केला. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages