शासनाकडून 1 हजार 89 कोटींच्या खर्चास मंजुरी
मुंबई, दि. 26 : ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील 27 गावांच्या अधिसूचित क्षेत्रात कल्याण ग्रोथ सेंटर विकसित करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. या केंद्रामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ परिसराच्या विकासास मोठी चालना मिळणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्रा धिकरणाची 138वी बैठक मुख्यमंत् र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. बैठकीला गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मुंबईच्या महापौर स्नेहल अंबेकर, आमदार डॉ. प्रकाश बिनसाळे यांच्यासह प्राधिकरणातील विविध महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
कल्याण ग्रोथ सेंटरच्या उभारणीसाठी प्राधि करणाने मान्यता दिली असूनत्याच् या विकासासाठी एक हजार 89 कोटी रूपये मंजूर केले आहेत. हे केंद्र रस्ता आणिरेल् वे मार्गांनी जोडण्यात येणार आहे. यामुळे मुंबईबाहेर रोजगा रनिर्मिती होऊन महानगरप्रदेशाचा समतोल विकास होण्यास मदत होणार आहे. विकास केंद्र विकसितकरण्या साठी प्राधिकरणातर्फे लवकरच पा याभूत सुविधांची निर्मिती करण् यात येणारआहे.
या ग्रोथ सेंटरच्या एक हजार 89 हेक्टर क्षेत्रापैकी पहिल्या टप्पात नगर नियोजन योजनेच्या माध्यमातून सुमारे 330 हेक्टर क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. या क्षेत्रापैकी सुमारे 330 हेक्टर क्षेत्रामध्ये मोकळ्या जागा उपलब्ध असून सुमारे 44 हेक्टर शासकीय जमिनींचा समावेश आहे. ही जमीन प्राधिकरणास विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येईल. हे 330 हेक्टर क्षेत्र निळजे रेल्वे स्टेशन व राज्य मार्ग क्रमांक 40 व 43च्या मधील असून या क्षेत्राच्या पश्चिमेला मेगासिटी प्रकल्प व पूर्वेला विशेष नगर वसाहत प्रकल्प विकसित करण्याचे काम सुरू आहे.
प्राधिकरणाने 2014 मध्ये कोरीयन सरकारच्या मदतीने एक हजार 21 हेक्टर क्षेत्रावरील या सेंटरच्या प्राथमिक अभ्यासात रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट क्लस्टर, वाणिज्य व रहिवासी वापर तसेच सार्वजनिक सोयी सुविधा प्रस्तावित केलेल्या आहेत. या वापरासाठी दोन ते चार चटई क्षेत्र निर्देशांक विचारात घेतला आहे. त्यानुसार त्याच्या विकासासाठी एकूण 11 हजार 890 कोटी रूपये खर्च दर्शविला होता. सद्यस्थितीत 27 गावांच्या अधिसूचित क्षेत्रासाठी शासनाने मार्च 2015 मध्ये मंजूर केलेल्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार वगळलेला भाग यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये अधिमूल्य आकारून कमाल चटई क्षेत्र निर्देशांक 1.95 हा 4000 चौ. मी. पेक्षा मोठ्या भूखंडांना जे 24 मी. पेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यालगत आहेत त्यांना देण्यात येणार आहे.
हे ग्रोथ सेंटर रस्ता आणि रेल्वे मार्गांनी जोडलेले असून ठाणे शहराच्या हद्दीलगत असून परिसरात वसाहती आहेत. या सेंटरमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. याठिकाणी प्रादेशिक स्तरावरचे उपक्रम, कार्य, सामुदायिक सभा, प्रदर्शन आणि संस्थात्मक वापरासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या केंद्राच्या सुनियोजित विकासामुळे अधिक चांगल्या स्वरुपात पायाभूत सोई-सुविधा निर्माण होऊन या क्षेत्रामधील व्यावसायिक व औद्योगिक गुणवत्तेस वाव मिळण्यास मदत होणार आहे. या केंद्राच्या पायाभूत सोयीसुविधांच्या विकासाकरिता एक हजार 89 कोटी रुपये खर्चाच्या तरतुदीसाठी यावेळी मान्यता देण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
