बेस्ट २३0 बसच्या दुरुस्तीसाठी २0 कोटी खर्च - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट २३0 बसच्या दुरुस्तीसाठी २0 कोटी खर्च

Share This
मुंबई : बेस्ट सेवांच्या दर्जावर टीका होत असताना २३0 बसेसच्या दुरुस्तीसाठी २0 क ोटी रुपये खर्च करण्याची योजना बेस्टने आखली आहे. या गाड्या दुरुस्तीअभावी चालवल्या जात नसल्याने दुरुस्तीनंतर प्रवाशांना त्याचा फ ायदा होईल, असा दावा केला जात आहे. बेस्टच्या ताफ्यातील २३0 बसेसचा क ायापालट करून त्या दैनंदिन वापरात आणण्यासाठी बेस्टने प्रयत्न सुरू केले आहेत. साधारण एका वर्षात या सर्व बसेस सेवेत येण्याची शक्यता आहे. बेस्ट समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेत या बसेसच्या दुरुस्ती खर्चाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. या बसेसच्या चेसिसमध्ये क ोणतेही बदल करण्यात येणार नसून त्यात बाह्यस्वरूपात बदल केले जाणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages