पीएफ दावे आता २0 दिवसांत निकाली काढण्याचा निर्णय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पीएफ दावे आता २0 दिवसांत निकाली काढण्याचा निर्णय

Share This
मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफचे दावे जलदगतीने निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. पीएफ, पेन्शन आणि विमा दावे निकाली काढण्याच्या वेळ र्मयादेत आता ३0 दिवसांवरून २0 दिवस, असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे पीएफ दावे २0 दिवसांच्या आत निकाली निघणार असल्याने कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी पीएफ दावे निकाली काढण्याची मुदत ३0 दिवसांची होती. त्यामुळे कर्मचार्‍यांना पीएफची रक्कम प्राप्त करून घेण्यासाठी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागली होती. ही मुदत १0 दिवसांनी कमी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाने यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकानुसार, ईपीएफओने जुलै महिन्यात पीएफ दावे निकाली काढण्याची मुदत २0 दिवस निश्‍चित केली. त्यानंतर संपूर्ण जुलै महिन्यात ईपीएफओने ११.५६ लाख दावे निकाली काढले. त्यापैकी ४३ टक्के अवघ्या ३ दिवसांत, ८३ टक्के १0 दिवसांत आणि ९७ टक्के २0 दिवसांत निकाली काढण्यात आले., अशी माहिती सेंट्रल पीएफ कमिशनर के. के. जालान यांनी दिली. नवीन वेळर्मयादेचे काटेकोर पालन करण्यासाठी ईपीएफओने कंबर कसली आहे. पेन्शनधारकांना जलद सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी फिल्ड ऑफिसर्सना बँकांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. फंड मॅनेजमेंटची क्षमता वाढवण्यासाठी ईपीएफओच्या अँडमिनीस्ट्रेशन अकाऊंटमध्ये नवीन निधी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages