महाराष्ट्रात गेल्या १0 वर्षांत १0 आरटीआय कार्यकर्त्यांच्या हत्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्रात गेल्या १0 वर्षांत १0 आरटीआय कार्यकर्त्यांच्या हत्या

Share This
मुंबई : प्रतिनिधी - सरकारी माहिती जनतेला मिळावी म्हणून माहिती अधिकार कायदा (आरटीआय) २00५ मध्ये अस्तित्वात आला. परंतु हा कायदा अलीकडच्या काळात अनेक आरटीआय कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करू लागला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ही गंभीर परिस्थिती असून गेल्या १0 वर्षांत १0 आरटीआय कार्यकर्त्यांना प्राण गमवावा लागल्याची माहिती पुढे आली आहे.

'कॉमनवेल्थ ह्यूमन राईट्स इनिशिएटीव्ह'च्या (सीएचआरआय) आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत ६0 आरटीआय कार्यकर्त्यांवर हल्ला व हत्येच्या घटना घडल्या आहेत. उर्वरित राज्यांच्या तुलनेत हे सर्वाधिक भयावह वास्तव आहे. आरटीआय कार्यकर्त्यांच्या हत्येच्या यादीत महाराष्ट्रा पाठोपाठ गुजरात व उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. या दोन्ही राज्यांत हत्येच्या प्रत्येकी ६ घटना घडल्या आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक व बिहार या राज्यांत प्रत्येकी ४ आरटीआय कार्यकर्त्यांचा बळी गेला. तसेच महाराष्ट्रात ६0, गुजरातमध्ये ३६, उत्तर प्रदेशात २५ आणि दिल्लीत २३ आरटीआय कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या. सीएचआरआयचे पदाधिकारी व्यंकटेश नायक यांनी याबाबत सांगितले की, आमच्याकडे उत्तर प्रदेशातून दाखल केल्या गेलेल्या आरटीआय अर्जांंची नेमकी आकडेवारी नाही, परंतु उपलब्ध आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक आरटीआय अर्ज दाखल करण्यात आले आहेत. येथील लोक अधिक जागरूक असल्याचे यावरून उघड होते. 

महाराष्ट्रात सर्वाधिक आरटीआय अर्ज भूखंड घोटाळ्याची माहिती उजेडात आणण्यासाठी दाखल होतात. त्यामुळे असे अर्ज दाखल करणार्‍या अनेक आरटीआय कार्यकर्त्यांच्या जीविताला धोका संभावतो. भिवंडीतील अनधिकृत बांधकामांचा पर्दाफाश करणारे आरटीआय कार्यकर्ते अबरार शेख यांची हत्या झाली तर मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा उलगडा करण्यासाठी प्रयत्नरत राहिलेले होते. पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी मुंबई-पुणे महामार्गातील घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी आरटीआयचा वापर सुरू केला होता. या माध्यमातून अनेक गैरव्यवहार उघडकीस आणणार्‍या सतीश शेट्टींची अखेर पुण्यात निर्घृण हत्या झाली. सध्या सतीश यांचे बंधू संदीप शेट्टी हे नोकरी सोडून सतीश यांच्या मारेकर्‍यांना कठोरात कठोर शिक्षा सुनावली जावी, यासाठी पूर्णवेळ लढा देत आहेत. 

राज्य      हत्या     हल्ला
महाराष्ट्र    १0       ६0
गुजरात      ६       ३६
उत्तर प्रदेश   ६       २५

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages