देशात अघोषितरीत्या आणीबाणी आणण्याचा डाव - रमेश जोशी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

देशात अघोषितरीत्या आणीबाणी आणण्याचा डाव - रमेश जोशी

Share This
मुंबई : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी उघडपणे आणीबाणी आणली; पण आज देशाचा वर्तमान व भविष्य बदलू पाहणार्‍या राज्यकर्त्यांनी देशाचा इतिहास पुसून देशात अतिशय छुप्या पद्धतीने अघोषितरीत्या आणीबाणी आणण्यास सुरुवात केल्याचे आरोप करून जनतेने आताच दक्ष व्हावे, असे आवाहन शिक्षक सभेचे सरचिटणीस रमेश जोशी यांनी केले. त्यासाठी शिक्षकांनी अधिक सजग होऊन देशावर पुन्हा एकदा घातलेल्या आणीबाणीच्या विरोधात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
भारतीय घटनेने नागरिकांना निश्‍चित असे मूलभूत अधिकार दिले आहेत. त्या मूलभूत अधिकार्‍यांचा राजरोसपणे संकोच करून शिक्षकांसह सर्वांचीच मुस्कटदाबी करण्याचा डाव राज्यकर्ते खेळत आहेत. गेल्या वर्षी केंद्रात सत्तारुढ झालेल्या सरकारची वाटचाल आणीबाणीकडे होईल, ही जनतेची भीती आता खरी ठरत असल्याचे सांगून लोकांनी आता जागरुक राहावयास हवे. शिक्षक हाच खरा समाजाच्या पाठीचा कणा असल्याने शिक्षकांनी दीपस्तंभ बनून आपल्या कणकर विचार आणि कृतीतून समाजाच्या पाठीशी उभे राहावयास असल्याचे या वेळी रमेश जोशी यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक सभेतर्फे शिक्षक दिनानिमित्त एका सोहळय़ाचे आयोजन शिवाजी मंदिर नाट्यगृहात केले होते. या प्रसंगी उपस्थित शिक्षक वंृदांना संबोधित करताना शिक्षक सभेचे सरचिटणीस रमेश जोशी बोलत होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, कामगार नेते दिवाकर दळवी, शिक्षक सभेचे कोषाध्यक्ष सुरेश गावडे, कार्यालयीन चिटणीस प्रकाश शेगुलवाडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ऊर्मिला जोशी आदी उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिल्पा नाईक होत्या.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages