मुंबई : राज्यातील सर्व स्थानिक रहिवाशांशी संबंधित माहिती जमा करण्याकरिता घरोघरी जाऊन प्रगणना करण्याचे क्षेत्रीय काम १0 ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २0१५ या कालावधीत पार पाडण्यात येणार आहे. शासनाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी नुकतेच हे अधिसूचित केले.
नागरिकत्व अधिनियम, १९५५ (१९५५ चा ५७) अन्वये तयार करण्यात आलेले, नागरिकत्व (नागरिकांचे नोंदणीकरण आणि राष्ट्रीय ओळखपत्रे देणे) नियम, २00३ च्या नियम ३ च्या उपनियम (४) अनुसार, भारत सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचा तसेच ज्या व्यक्ती बहुतकरून स्थानिक निबंधकाच्या अधिकार क्षेत्रात राहत आहेत अशा सर्व व्यक्तींच्या संबंधातील माहिती जमा करण्याकरिता देशभरात घरोघरी जाऊन १ जुलै १५ पासून त्यांची प्रगणना करण्याचे क्षेत्रीय काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारे व संघ राज्यक्षेत्रे यांना आवश्यक ती माहिती जमा करण्याकरिता एक महिन्याचा प्रगणना कालावधी प्रसिद्ध करण्याचे निदेश दिले आहेत. याचाच एक भाग म्हणून ही प्रगणना होणार आहे
