पालिका डोंगरमाध्यावर सिंटेक्सची टाकी बसवून टँकरने पाणीपुरवठा करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका डोंगरमाध्यावर सिंटेक्सची टाकी बसवून टँकरने पाणीपुरवठा करणार

Share This
मुंबई 4 Sep. 2015 ( प्रतिनिधी ) - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात यंदा पाठ फिरवल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत 29 टक्के पाणी कमी आहे पाऊस पुढे पडण्याची आशा दिसत नसल्याने पालिकेने मुंबईकरांवर सध्या 20 टक्के पाणी कपात लागू केली आहे मात्र या कपातीमुळे डोंगरमाध्यावर राहणाऱ्या लाखो लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे त्यामुळे  परिस्थिती अतिशय गंभीर असून ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पालिकेने मुंबईतील विहीरी , बोअरवेल  दुरूस्ती करून यातील पाणी इतर वापरासाठी देण्याची सोय केली आहे तसेच डोंगराळभागात पिण्याच्या पाण्यासाठी पालिकेतर्फे सिंटेक्सची टाकी बसवून टँकरने पाणी देण्यात येईल असे आश्वासन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप लांडे यांना दिले

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईत पालिकेने 20 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र अजूनही तलाव क्षेत्रात पुरेसा पाऊस पडत नसल्याने पाणी कपातीत वाढ होण्याची शक्यता आहे आधीच 20 टक्के पाणी कपातीमुळे डोंगरावर राहणाऱ्या लाखो लोकांना पाणी मिळणे पचंड अडचणीचे झाले आहे त्यामुळे यापुढे मुंबईत पाणी पश्नावरून वादंग होण्याची शक्यता गृहीत धरून पालिकेने पाणी कपातीचा सामना करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना त्वरित अंमलात आणाव्यात अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक दिलीप लांडे यांनी अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे केली आहे मुंबईकरांना योग्य प्रमाणात पाणी मिळण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे गाड्या धुणे  , उधान बगिचे , तरण तलाव यासाठी विहीरीच्या पाण्याचा वापर करावा मुंबईत अनेक प्रभागात विहीरी व बोअरवेल असून या पाण्याचा वापर इतर कामांसाठी करण्याचे आवाहन करावे याकामी महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दलाची मदत घ्यावी सध्या मुंबईकरांवर  केलेली 20 टक्के पाणी कपातीमुळे डोंगरावर राहणाऱ्या लाखो लोकांचे तोंडचे पाणी पळाले आहे त्यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पालिकेने मुंबईतील विहीरी बोअरवेल दुरूस्ती करून यातील पाणी इतर वापरासाठी देण्याची सोय करावी तसेच डोंगराळभागात पिण्याच्या पाण्यासाठी पालिकेतर्फे सिंटेक्सची टाकी बसवून टँकरने पाणीपुरवठा करावा या अनेक मुद्यांवर आज शुक्रवारी चचाॅ करण्यासाठी मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली आणि चचाॅ केली त्यावेळी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी विहीरी , बोअरवेल दुरूस्ती करून यातील पाणी इतर वापरासाठी देण्याची सोय करण्यात येईल तसेच डोंगराळभागात पिण्याच्या पाण्यासाठी सिंटेक्सची टाकी बसवून टँकरने पाणी देण्यात येईल असे आश्वासन दिले अशी माहिती दिलीप लांडे यांनी दिली आहे मुंबईकरांना आयुक्तांच्या आश्वासनाने मोठा दिलासा मिळाला आहे असे ही लांडे यांनी सांगितले

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages