लोकलच्या गर्दीमुळे १0 वर्षांत २९,२७८ प्रवाशांचा अपघाती मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकलच्या गर्दीमुळे १0 वर्षांत २९,२७८ प्रवाशांचा अपघाती मृत्यू

Share This

मुंबई / प्रतिनिधी - मुंबईकरांची 'जीवनवाहिनी' वर गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्युमुखी पडणार्‍या प्रवाशांची संख्या तितक्याच पटीने वाढती आहे. उपनगरी मार्गावर गेल्या १0 वर्षांत २९,२७८ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाल्याचे माहिती अधिकारातून (आरटीआय) उजेडात आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनीस खान यांनी माहिती अधिकाराच्या आधारे रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) याबाबत आकडेवारी मागितली होती. त्यांच्या अर्जावर प्रशासनाने मागील दहा वर्षांतील आकडेवारी उपलब्ध केली. त्यानुसार, मागील दहा वर्षांत पश्‍चिम, मध्य आणि हार्बरच्या लोकल गाड्यांमधून २५,७२२ प्रवासी पडले. त्यातील ६,९८९ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १८,७३३ प्रवासी जखमी झाले. २00५ साली धावत्या लोकलमधून पडून ४९४ प्रवाशांना प्राण गमवावा लागला. त्यात पुढील प्रत्येक वर्षाला बळींची संख्या वाढतच गेली आणि २0१३ मध्ये ९0१ इतक्या बळींची नोंद झाली. २00५च्या तुलनेत हे प्रमाण ८२ टक्क्यांनी वाढले. २0१४ साली लोकलमधून पडून मृत्यूमुखी झालेल्या प्रवाशांचे प्रमाण काहीसे कमी झाले. या वर्षी ७९७ प्रवाशांचा मृत्यू झाला.

रेल्वे प्रशासन मुंबईकरांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास पुरवण्याकामी पूर्णपणे अपयशी ठरले आहे. प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे अधिकारी पूर्णपणे अपयशी ठरल्याने प्रत्येक वर्षी शेकडो प्रवाशांना प्राण्यांप्रमाणे जीव गमवावा लागत आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी लोकलमधून प्रवास करत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रवाशांच्या प्रश्नांची जाण नाही. जोपर्यंत या अधिकार्‍यांना वाढत्या गर्दीचे गांभीर्य लक्षात येत नाही. तोपर्यंत निष्पाप प्रवाशांचे बळी जाणे थांबणार नाही, असा दावा आरटीआय कार्यकर्ते अंनिस खान यांनी केला आहे. गेल्या १0 वर्षांत रेल्वे रूळ ओलांडताना २२,२८९ प्रवाशांचा बळी गेल्याची माहिती पुढे आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages