एसआरएमधील एकापेक्षा अधिक घरांच्या मालकांवर कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एसआरएमधील एकापेक्षा अधिक घरांच्या मालकांवर कारवाई

Share This
मुंबई : झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाअंतर्गत पुनर्विकास झाल्यानंतर जर एकापेक्षा अधिक घरे एकाच व्यक्तीच्या नावावर असल्यास कारवाई करण्याबाबत सध्या राज्य सरकारकडून विचार सुरू असून ज्यांच्या नावावर एकपेक्षा अधिक घरे आहेत, अशा रहिवाशांना चाप बसण्याची चिन्हे आहेत. जेथे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाअंतर्गत प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तेथील माहिती डाटा सेंटरमध्ये एकत्रित करण्यात येत आहे. या डेटा सेंटरमधील माहितीच्या आधारावर एकपेक्षा अधिक घरांच्या मालकांवर कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. 
मुंबई तसेच पूर्व-पश्‍चिम उपनगरातील मुंबई महानगरपालिका, जिल्हाधिकारी भूखंड, तसेच एमएमआरडीए, बीपीटी, महसूल विभाग, विमानतळ भूखंड येथे २0 ते ४0 वर्षांपूर्वीच्या झोपड्या विस्तारल्या आहेत. या झोपड्यातील अधिकृत रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणातर्फे प्रकल्प राबवून मोफत घरे उपलब्ध करण्यात येतात. गेल्या २0 वर्षांत दोन लाख घरांची निर्मिती एसआरएच्या माध्यमातून करण्यात आली असून या घरांचे वाटप ज्या घरमालकांच्या नावावर करण्यात आले, त्यांनी या मोफत घरांचा फायदा दोनदा किंवा त्याहून अधिक वेळा घेतला असेल त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. या डेटा सेंटर्ससाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाबाबत एखाद्या कंपनीची निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages