चालू वर्षात रेल्वे अपघातांमध्ये २३४0 प्रवाशांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चालू वर्षात रेल्वे अपघातांमध्ये २३४0 प्रवाशांचा मृत्यू

Share This
मुंबईकरांची जीवनवाहिनी मृत्युवाहिनी बनत चालली आहे. गेल्या २४ तासात लोकल अपघातांमध्ये १४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या १0 आहे. यातील सर्व अपघाती मृत्यूच्या घटना मध्य रेल्वेवर घडले आहेत. तर पश्‍चिम रेल्वेवर दिवसभरात तीन जण जखमी झाले आहेत. २0१५ या चालू वर्षात २३४0 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर २३४७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 

उपनगरीय रेल्वेच्या स्थापनेला सुमारे ६0 वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे. उपनगरीय रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर सर्वात जास्त प्रवासी संख्या आहे. सुमारे १५0 किमीच्या पट्टय़ात मध्य रेल्वे विस्तारलेली आहे. सीएसटी-कसारा-कर्जत आणि पनवेलपर्यंत मध्य रेल्वे धावते. मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक अपघातांची संख्या आहे. २00५-0६ मध्ये मध्य रेल्वे मार्गावर ३0 लाख प्रवासी दररोज प्रवास करीत होते, परंतु आता ही संख्या वाढून ४0 लाखांच्या घरात गेली आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमधून तोल गेल्याने बाहेर लटकत असताना पोलचा धक्का लागल्याने, रेल्वे ट्रॅक क्रॉस करीत असताना, लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये राहणार्‍या गॅपमध्ये पडून अपघात होणार्‍यांची संख्या जास्त आहे. 

पश्‍चिम रेल्वे मार्गावरदेखील अपघातांची संख्या जास्त आहे. परेवरील बोरिवली आणि वसई या दोन स्थानकांत सर्वाधिक अपघात नोंदविले गेले आहेत. त्याचबरोबर गोरेगाव, कांदिवली आणि विरार स्थानकामध्ये देखील अपघातांचे प्रमाण जास्त आहे. बुधवारी झालेल्या अपघातांमध्ये ठाणे व त्या पलिकडील ९ जणांचा समावेश आहे. ठाणे,डोंबिवली व कर्जत रेल्वे पोलिसांच्या हद्दीत प्रत्येकी १ तसेच कल्याण आणि वाशी पोलिसांच्या हद्दीत प्रत्येकी तीन जणांचा बुधवारी बळी गेला.

सप्टेंबर २0१५ पर्यंत आकडेवारी
एकूण मृत्युमुखी २३४0
पुरुष- २0७६
महिला- २६२
इतर- 0२
ओळख पटलेले-१६0७
ओळख न पटलेले- ७३३

मरे-परे स्थानकांवरील अपघात संख्या
कुर्ला- ३0५
दादर-१२६
कल्याण-३५१
सीएसटी-११५
कर्जत- ५0
ठाणे-२७९
डोंबिवली-१४९
वडाळा-१५५
वाशी- १६४
पनवेल-६४
अंधेरी- ८९
वांद्रे-९३
बोरिवली- २४0
मुंबई सेंट्रल- १0७
चर्चगेट-५४
वसई-२00
पालघर- १0९
आकडेवारी रेल्वे पोलिसांच्या शोध संकेतस्थळावरून

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages