मुंबई (प्रतिनिधी): शालेय विद्यार्थ्यांनीवर होणारे लैंगिक अत्याचार तसेच अल्पवयीन मुलींवर वाढते गर्भपाताचे प्रमाण लक्षात घेऊन पालिका शाळेतील ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून येत्या शेक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
१५ वर्षावरील अल्पवयीन मुलींच्या गर्भपाताच्या संख्येत मोती वाढ झाल्याचे आढळून आले असून या वयोगटातील बहुतांश मुली या दारिद्र्य रेषेखालील असल्याचे निदर्सानास आले आहे. १५ वर्ष वयोगटातील मुले तारुण्याच्या उंबरठ्यावर असतात काही शाळेमध्ये मुलींवर लेंगिक अत्याचार होतात. काही शालेय विध्यार्थी मोबाईल,लपटोप इतर माध्यमातून इंटरनेट व फेसबुक द्वारे लैंगिक विषयाबाबत माहिती करून घेतात. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या शाळेमध्ये लैंगिक शिक्षण सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. किशोरवयातील मुलीना सदर लैंगिक शिक्षणाबद्दल माहिती दिल्यास समजासाठी एक चांगले पाऊल पडेल त्यामुळे पालिका शाळेतील विशेषता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनासाठी लैंगिक शिक्षण सुरु करावे अशी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी काही महिन्या पूर्वी शिक्षण समितीच्या बैठकीत मागणी केली होती.
त्यास पालिका आयुक्तांनी सहमती देत येत्या शेक्षणिक वर्षापासून ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देण्यात यईल असे प्रशासनाने म्हंटले आहे. पालिकेतर्फे यापूर्वीपासूनच काही प्रमणात किशोरवयीन विद्यार्थ्यांनातारुण्याच्या उंबरठ्यावर शारीरिक, मानसिक बदलांबाबत आणि विद्यार्थ्यांनिंना मासिक पाळीबाबत माहिती देऊन अवगत केले आहे, असे प्रशासनाने म्हंटले आहे विद्यार्थ्यांनच्या शंकाचे निरसन होईल, त्यांच्यातील भीती दूर होईल. लेंगिक अत्याचार म्हणजे काय ? तशी अत्याचाराची घटना घडली तर काय करावे. कोटे व कशी मदत मिळवावी तक्रार कोणाकडे करावी, आदींबाबतची माहिती या विद्यार्थ्यांना मिळेल असा उद्देश या मागणी मागे शीतल म्हात्रे यांचा आहे. मात्र आपल्याकडे "लैंगिक शिक्षण " या विषयाकडे बघण्याची संकुचित दृष्टी पाहता त्यास " आरोग्य व शारिरीक शिक्षण " असे नाव देऊन हे लैंगिक शिक्षण द्यावे, असे शितल म्हात्रे यांनी म्हंटले आहे.