डॉ. राजन वेळूकर यांच्या ५ वर्षांत १0 परदेशवार्‍या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. राजन वेळूकर यांच्या ५ वर्षांत १0 परदेशवार्‍या

Share This
मुंबई : 24 Sep 2015
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी ५ वर्षांत १0 परदेशवार्‍या करत मुंबई विद्यापीठाच्या तिजोरीतून १४.१0 लाखाचा खर्च केला आहे. तसेच देशांतर्गत केलेल्या ४१ वार्‍यांवर ४.११ लाख असे दोन्ही एकूण १८.२२ लाख खर्च झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी मागील ५ वर्षांत देशांतर्गत आणि परदेशात केलेला दौरा आणि एकूण खर्चाची माहिती मागितली होती. ३ महिन्यांनंतर मुंबई विद्यापीठाच्या वित्त आणि लेखा विभागाचे उपनिबंधक व्ही. एफ. तायडे यांनी अनिल गलगली यांना माहिती उपलब्ध करून दिली. वर्ष २0१0 ते २0१५ या कालावधीत माजी कुलगुरू डॉ. वेळूकर यांनी ४१ देशांतर्गत आणि १0 देशाबाहेर असे एकूण ५१ दौरे केले. एकूण १८ लाख २२ हजार आणि २0 रुपये मुंबई विद्यापीठाच्या तिजोरीतून खर्च करण्यात आले असून सर्वाधिक खर्च हा परदेशवारी झाला आहे. ३ वेळा चीन, २ वेळा हॉवर्ड युनिव्हर्सिटी, न्यूझीलंड, लंडन, ऑस्ट्रेलिया अशी परदेशवारी केली आहे. विशेष म्हणजे कुलगुरू बनताच डॉ. राजन वेळूकर यांनी वर्ष २0११-१२ या कालावधीत सर्वाधिक ८ लाख ५७ हजार ८७६ रुपये प्रवासांवर खर्च केले आहे. यामध्ये चार परदेश दौर्‍यांचा समावेश असून न्यूझीलंड दौर्‍याचा १000 डॉलरचा खर्च यूजीसीने वहन केला. रेल्वेचा स्वस्त पर्याय उपलब्ध असताना डॉ.वेळूकर यांनी विमानाचा महागडा पर्याय निवडला.

कुलपतींच्या परवानगीची माहिती दिली नाहीमाजी कुलगुरू डॉ. वेळूकर यांनी परदेशवारी करण्यासाठी कुलपती म्हणजे राज्यपाल किंवा शासनाच्या घेतलेल्या परवानगीची माहिती मागितली असता अनिल गलगली यांना ती देण्याचे टाळण्यात आले. त्यामुळेच परवानगी घेतली किंवा नाही, याबाबत स्पष्टता नाही. मुंबई विद्यापीठाचा कारभार शुल्कातून जमा होणार्‍या पैशातून चालतो त्यामुळे कुलगुरूसारख्या उच्च पदस्थ व्यक्तीकडून अशी उधळपट्टी कदापि सर्मथनीय नाही. याबाबत राज्यपाल आणि शासनास पत्र पाठवून पैसे वसूल करत संबंधितांवर कारवाई करत भविष्यात अशा प्रकारच्या उधळपट्टीवर अंकुश लावण्याची मागणी गलगली यांनी केली आहे.-- 


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages