30 सप्टेम्बर नंतर पाणी कपात वाढवण्याचा निर्णय
24 हजार बंद मिटरला नोटिस
मुंबई 15 Sep 2015 ( अजेयकुमार जाधव )
तहान लागल्यावर विहीर खोदणे या म्हणी प्रमाणे मुंबई महानगर पालिकेची गत झाली आहे. मुंबईमधे 15 टक्के पाणी कपात सुरु असताना पाणी पुरवठा करणार्या पाईप लाइन वर असलेले 1 लाख 54 हजार 197 मिटर बंद अवसस्थेत आहेत त्यापैकी 24 हजार 332 मीटर धारकाना नोटिस बजावन्यात आली आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिली.
मुंबईला पाणी पुरवठा करणार्या तलाव क्षेत्रात या वर्षी क़मी प्रमाणात पाउस पडला आहे. यामुले तालावात 32 टक्के कमी पाण्याचा साठा आहे. 16 तरण तलावाला पालिकेकडून पाणी पुरवठा केला जात होता हा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. 16 बंद बाटल्यामधून पाणी विक्री करनार्या कंपन्यांचा पाणी पुरवठाही बंद केल्याची माहिती मुखर्जी यांनी दिली.
31 अवैध पंप बंद केले आहेत. 431 अवैध पाणी कनेक्शन तोडली असून 3 कनेक्शन पोलिस सरक्षण घेवुन तोड्न्यात येतील. शहरात 1751 ठिकाणी पाणी गलती असून त्यापैकी 1746 ठिकाणी, पश्चिम उपनगरात 1445 ठिकाणी पाणी गलती होती त्यापैकी 1353 ठीकाणी तर पूर्व उपनगरातील 1994 ठिकाणची पाणी गलती रोखण्यात आल्याचे मुखर्जी यांनी सांगितले.
पाणी वाटपाची वेळ आणि प्रमाण याचा आढावा घेवुन पाणी वाटपाची वेळ ठरवली जाणार आहे. 30 सप्टेम्बरपर्यन्त किती पाउस पडतो याचा अंदाज घेवुन पाणी कपात वाढवायची की पाणी कपात कमी करायची याचा निर्णय घेतला जाइल.
सीवरेज ट्रीटमेंट प्लांट नसलेल्या इमारतींवर कारवाई
2006 नंतर बांधल्या जाणार्या इमारती परिसरात सीवरेज ट्रीटमेंट प्लांट बसवल्यावरच पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. अश्या परिसरात पाण्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. असे प्लांट नसलेल्या ठिकाणी पर्यावरण कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

367 तक्रारी प्रलंबित
पाणी गलती आणि पाणी वाटपाबाबत 6858 तक्रारी आल्या असून त्यापैकी 6491 तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे. अद्याप 367 तक्रारी प्रलंबित आहेत. तक्रार निवारण विभागात येणार्या तक्रारिंचे 48 तासात निवारण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.