विसर्जनासाठी चौपाट्यांवर जर्मन तराफे, मोठ्या क्रेनची व्यवस्था - पालिका 15 कोटी खर्च करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विसर्जनासाठी चौपाट्यांवर जर्मन तराफे, मोठ्या क्रेनची व्यवस्था - पालिका 15 कोटी खर्च करणार

Share This
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) -,  मंगलमूर्ती गणरायाच्या मूर्तींची गुरुवार प्रतिष्ठापना होईल. दीड, पाच, सात आणि 10 दिवसांचे गणपती आणि गौरींच्या विसर्जनाची तयारी महापालिकेने केली आहे. दादर आणि गिरगाव चौपाट्यांवर जर्मन तराफे आणि मोठ्या क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जन व्यवस्थेसाठी यंदा महापालिका 15 कोटी खर्च करणार आहे, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

दादर चौपाटीवर यंदा पहिल्यांदाच कॉंक्रीटचा रस्ता तयार केला असून दादर आणि गिरगाव चौपाट्यांवर मोठ्या क्रेन ठेवल्या आहेत. त्यामुळे मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाला वेग येईल, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. यंदा विसर्जनासाठी जर्मन बनावटीच्या तराफ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे. महापालिकेने 29 तराफ्यांची व्यवस्था केली आहे. काही तरूणांना तराफ्यांतून विसर्जन करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. विसर्जनसाठी येणारी वाहने वाळूत रुतू नयेत, यासाठी चौपाट्यांवर 301 लोखंडी प्लेट टाकण्यात आल्या आहेत. निर्माल्य टाकण्यासाठी 175 कलष ठेवण्यात आले असून त्याचा वापर खतासाठी केला जाणार नाही. अनुचित घटना टाळण्यासाठी महापालिकेने जीवरक्षकांची संख्याही वाढवली आहे.


विसर्जन स्थळांवरील व्यवस्था
मुंबईतील विसर्जनस्थळे : 71
कृत्रिम तलाव : 26
जीवरक्षक : 404
मोटरबोटी : 55
रुग्णवाहिका : 55
तात्पुरती शौचालये : 77
निर्माल्यासाठी डंपर : 172
फ्लड लाईट : 1530
निरीक्षण मनोरे : 64

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages