मुंबई / अजेयकुमार जाधव / 21 Sep 2015
मोडक सागर तलाव परिसरात 48 मिमी पाऊस पडला आहे. तानसा तलाव परिसरात 44 मिमी, विहार तलाव परिसरात 65 मिमी, तुलसी तलाव परिसरात 33 मिमी, अप्पर वैतरणा परिसरात 38 मिमी, भातसा तलाव परिसरात 69 मिमी तर मध्य वैतरणा तलाव परिसरात 32 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मोड़क सागर धरण रविवारी 20 सप्टेंबरला दुपारी 3.20 वाजता भरुन वाहू लागले आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांपैकी बहुतेक धरणक्षेत्रात रविवार पर्यंत चांगला पाऊस झाला आहे. शुक्रवार शनिवार आणि रविवार या तिन दिवसात 1लाख 13 हजार 260 दशलक्ष लिटर पाणी साठा वाढला आहे. यामुळे आता मुंबईला 295 दिवस पाणी पुरवठा केला जाऊ शकतो.
मोडक सागर तलाव परिसरात 48 मिमी पाऊस पडला आहे. तानसा तलाव परिसरात 44 मिमी, विहार तलाव परिसरात 65 मिमी, तुलसी तलाव परिसरात 33 मिमी, अप्पर वैतरणा परिसरात 38 मिमी, भातसा तलाव परिसरात 69 मिमी तर मध्य वैतरणा तलाव परिसरात 32 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मोड़क सागर धरण रविवारी 20 सप्टेंबरला दुपारी 3.20 वाजता भरुन वाहू लागले आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव पाण्याने पूर्ण भरले तर उपयुक्त पाणीसाठा हा 14,47,363 दशलक्ष लिटर एवढा असतो. मुंबईला शुक्रवारपर्यंत केवळ 211 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठाही अत्यंत कमी आहे. मात्र गेल्या तिन दिवसांत 1 लाख दशलक्ष लिटर पाणी साठ्यात वाढ झाली आहे. सर्व तलावांमध्ये 11,07,411 दशलक्ष लिटर इतका पाण्याचा साठा आहे. मुंबईत दररोज 3750 दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातो. तिन दिवसात पडलेल्या पाऊसामुळे आता 295 दिवसांचा पाणी साठा जमा झाला आहे.
तलाव पातळी - 21 सप्टेंबर 2015
मोडक सागर -- 128925 दशलक्ष लिटर
तानसा -- 129963 दशलक्ष लिटर
विहार -- 12417 दशलक्ष लिटर
तुळशी -- 7969 दशलक्ष लिटर
अप्पर वैतरणा -- 127760 दशलक्ष लिटर
भातसा - 508598 दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा -- 191778 दशलक्ष लिटर
एकूण जलसाठा -- 1107411 दशलक्ष लिटर
मोडक सागर -- 128925 दशलक्ष लिटर
तानसा -- 129963 दशलक्ष लिटर
विहार -- 12417 दशलक्ष लिटर
तुळशी -- 7969 दशलक्ष लिटर
अप्पर वैतरणा -- 127760 दशलक्ष लिटर
भातसा - 508598 दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा -- 191778 दशलक्ष लिटर
एकूण जलसाठा -- 1107411 दशलक्ष लिटर