भांडुपमध्ये मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी 50 लाखाचा सल्लागार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भांडुपमध्ये मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी 50 लाखाचा सल्लागार

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव / 21 Sep 2015
पूर्व उपनगरातील भांडुप पश्‍चिम येथे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी वास्तुशास्त्रीय सल्लागार व आरोग्य सल्लागार नेमण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी पालिकेने ५0 लाखांचा प्रस्ताव स्थायी समिती समोर सादर केला आहे.

रुग्णालय उभारणीसाठी स्वारस्य असलेल्या सल्लागार व कंत्राटदारांकडून स्वारस्य अभिरुची मागवण्याची प्रक्रिया आयुक्तांच्या कार्यालयाकडून २७ फेब्रुवारी २0१४ पासून सुरू झाली. त्यासाठी काही वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन हे काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या सल्लागारांकडून (वास्तुशास्त्र आणि आरोग्य सल्लागार एकत्रित) स्वारस्य अभिरुची मागवण्यात आली. यासाठी एकूण १७ सल्लागारांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यांच्या कागदपत्रांची छाननी केली असता, त्यापैकी सात सल्लागार सादरीकरणासाठी पात्र ठरले.

पात्र ठरलेल्या सात सल्लागारांपैकी सहा सल्लागारांनी गाभा समितीसमोर प्रस्तावाचे सादरीकरण केले. यानंतर लघुत्तम देकार देणारे 'मे. शशी प्रभू अँड असोशिएट' (वास्तुशास्त्रज्ञ) आणि आरोग्य सल्लागार टेलिकॉम हेल्थकेअर प्रा. लि.' यांची एकत्रित नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी शशि प्रभु एंड असोसिएट्स ला 50 लाख रुपये सल्लागार शुल्क म्हणून देण्यात येणार असून बुधवारच्या स्थायी समिती बैठकीत हां प्रस्ताव मंजूरीसाठी सादर करण्यात आला आहे.

सल्लागारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. मंजुरीनंतर सल्लागार नियुक्त करण्यात येईल. नंतर नकाशे बनवणे, इमारत प्रस्ताव खात्यांकडून मंजुरी मिळवणे, अंदाजपत्रक तयार करणे आदी कामे केली जातील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages