तांत्रिक कारणांमुळे बेस्टची वीज बिले विलंबाने - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तांत्रिक कारणांमुळे बेस्टची वीज बिले विलंबाने

Share This
मुंबई : बेस्टच्या विद्युत विभागातील तांत्रिक कारणांमुळे सप्टेंबर २0१५ या महिन्याची बेस्ट विद्युत देयके तयार करण्यास विलंब होत आहे. या कारणास्तव मागील तीन महिन्यांच्या सरासरी रक मेवर आधारित तात्पुरती-अंतरिम देयके (बिल) तयार करण्यात येत आहेत. ही बिले तात्पुरत्या स्वरूपाची असल्यामुळे यामध्ये फक्त ग्राहकाचा तपशील व एकूण देय रक्कम छापण्यात येणार आहे. अशा प्रकारचा संदेश तात्पुरत्या वीज देयकावर ग्राहकांच्या माहितीसाठी छापण्यात येणार आहे.

वीजग्राहकांनी हे तात्पुरते वीज देयक भरावे, अशी विनंती बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. पुढील महिन्याचे वीजदेयक हे दोन महिन्यांसाठी प्रत्यक्ष मीटरवाचनावर आधारित असणार आहे. ज्यात प्रत्येक महिन्याच्या आवश्यक त्या स्लॅबचा लाभ देण्यात येईल. देय दिनांकापूर्वी तात्पुरत्या वीज देयकाचे प्रदान केल्यास ही रक्कम पुढील महिन्याच्या वीज देयकामध्ये समायोजित करण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी बेस्टच्या ग्राहकसेवा विभागाशी संपर्क साधावा, अशी विनंती बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages