राज्यात 15 दिवसांत स्वाईन फ्लूचे 74 बळी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यात 15 दिवसांत स्वाईन फ्लूचे 74 बळी

Share This
मुंबई 18 Sep 2015 
नवीन वर्षापासून राज्यात स्वाईन फ्लूचे थैमान कायम आहे. सप्टेंबरच्या 15 दिवसांत स्वाईन फ्लूने 74 रुग्णांचा बळी घेतला असून 800 रुग्णांची नोंद झाली. 

राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या 15 दिवसांत स्वाईन फ्लूचे 829 रुग्ण आढळले. या साथीने 74 रुग्णांचा बळी घेतला; त्यापैकी तिघे जण अन्य राज्यांतून आले होते. राज्यात 24 तासांत स्वाईन फ्लूचे 67 रुग्ण आढळले; तर सात जणांचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या रुग्णालयांत 399 जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी 27 रुग्ण कृत्रिम श्‍वासोच्छ्वासावर आहेत. या काळात तीन हजार 61 संशयित रुग्णांची नोंद झाली. राज्यात 1 जानेवारीपासून स्वाईन फ्लूचे सात हजार 672 रुग्ण आढळले. त्यापैकी 697 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमधील 36 रुग्ण अन्य राज्यांतून उपचारासाठी आले होते.

विषाणूंत बदल 
स्वाईन फ्लूचे विषाणू साधारणत: थंडीच्या दिवसांत सक्रिय असतात; मात्र त्यांच्यात झालेल्या बदलांमुळे या आजाराचे रुग्ण वर्षभर दिसू लागले आहेत. तापमान वाढल्यानंतर स्वाईन फ्लूचे रुग्ण कमी होतील, असा अंदाज होता. पाऊस आणि ऊन यांच्या पाठशिवणीमुळे जुलैच्या शेवटी स्वाईन फ्लूने राज्यभरात डोके वर काढले

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages