मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या सरासरीच्या 30 टक्के पाणीसाठा कमी आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी 500 मि. मी. पावसाची आवश्यकता आहे.
मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 14 लाख 50 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आवश्यक आहे; तर सध्या तलवांमध्ये नऊ लाख 96 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. काही दिवसांपासून मुंबई परिसरात पाऊस पडत असला तरी तलावांच्या पाणलोट क्षेत्रावर मात्र त्याची कृपादृष्टी झालेली नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणारे प्रमुख जलाशय असलेल्या शहापूर तालुक्यात सरासरी 2200 ते 2400 मि.मी. पाऊस पडतो. या सरासरीच्या 80 टक्के पाऊस झाला तरी तलावात पुरेसा पाणीसाठा जमा होतो. जलाशयांच्या क्षेत्रात 500 मि. मी. पावसाची भर पडल्यास मुंबईवरील कपातीचे संकट दूर होऊ शकेल, असे पालिकेच्या पाणी खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले; तर अजून महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरू झाला नसल्याचे हवामान खात्याने जाहीर केलेले नाही. त्यामुळे पालिकेला अजूनही पाऊस पडेल, अशी आशा आहे.

तक्रारींसाठी हेल्पलाईन
कमी पाणीपुरवठा; तसेच पाणीपुरवठा होत नसल्यास तक्रार करण्यासाठी पालिकेने हेल्पलाईन सुरू केली आहे. पालिकेच्या 1916 या हेल्पलाईनबरोबरच पश्चिम उपनगरासाठी 26146852, 26184173 आणि पूर्व उपनगरासाठी 25153258 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
तलाव क्षेत्रातील पाऊस (मि.मी.मध्ये)
- तलाव.......... वर्ष 2014..... वर्ष 2015
- मोडकसागर - 2227 1595
- तानसा - 2360 1523
- विहार - 2755 1890
- तुलसी - 3131 2159
- अप्पर वैतरणा - 2371 1640
- भातसा - 2665 1751
- मध्य वैतरणा - 2042 1734