गणेशोत्सवात पालिकेने दोन दिवस पाणी कपात मागे घेतली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गणेशोत्सवात पालिकेने दोन दिवस पाणी कपात मागे घेतली

Share This
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात  यंदा आत्तापर्यंत झालेल्या कमी पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी 29 टक्के कमी पाणीसाठा कमी आहे     त्यामुळे मुंबई समोर अद्याप पाणी संकट कायम असून सद्या मुंबईकरांवर 20 टक्के पाणी कपात लागू आहे मात्र उद्या गुरुवार पासून मराठी माणसाचा मोठा सन गणेशोत्सव सुरू होत आहे या गणेशोत्सवाच्या काळात गणपती आगमन आणि अनंत चतुदर्शी या दोन दिवशी मुंबईकरांवर लागू केलेली 20 टक्के पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये गेल्यावर्षी 14 लाख 26 हजार 821 दशलक्ष लिटर पाणी साठा होता. सध्या या धरणांमध्ये 9 लाख 96  हजार 243 दश लक्ष लिटर पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा मुंबईसमोर गंभीर पाणी संकट उभे आहे त्यामुळे मुंबईकरांना वषॅभर पाणी पुरवठा व्हावा यासाठी.पालिकेने 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून शहरात 20 टक्के पाणीकपात लागू केली आहे. तर तरण तलाव, मॉल्स, तारांकित हॉटेल्स, बाटलीबंद पाण्याचे कारखाने, रेसकोर्स आदींच्या पाणीपुरवठय़ात 50 टक्क्यांनी कपात करण्यात आली मात्र मराठी माणसाचा मोठा गणेशोत्सव सन उद्या गुरुवार पासून सुरू होत आहे या गणेशोत्सवाच्या काळात पाहुण्यांची  वदॅळ मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे मुंबईकरांना जास्त पाण्याची आवश्यकता भासत असते या सणासुदीच्या काळात गणपती आगमन आणि अनंत चतुदर्शी या दोन दिवशी मुंबईकरांवर लागू केलेली 20 टक्के पाणी कपात मागे घेण्याची मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आणि आमदार राम कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली मुख्यमंत्र्यांनी तात्काळ महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना निदेॅश देवून या दोन दिवशी पाणी कपात मागे घेण्याचे सांगितले पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी लगेच मुख्यमंत्र्यांच्या निदेॅशाचे पालन करून दोन दिवस पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय आज घेतला  या आयुक्तांच्या निर्णयाने मुंबई करांना मोठा दिलासा मिळाला आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages