कांजूरमार्ग भरावभूमी येथील घनकचऱ्याची दुर्गंधी हटविण्यासाठी 2 कोटीचा निधी मंजूर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कांजूरमार्ग भरावभूमी येथील घनकचऱ्याची दुर्गंधी हटविण्यासाठी 2 कोटीचा निधी मंजूर

Share This
शास्त्रोक्त पद्धतीने बायोरिऍक्टर तंत्रज्ञान वापरून कचऱ्याची विल्हेवाट
मुंबई / मुकेश श्रीकृष्ण धावडे
कांजूरमार्ग पूर्व येथील खार जमिनवर भरावभूमी (DUMPING GROUND) केल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणाहून  कचरा आणून टाकला जातो. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून येथील परिसरात या कचऱ्यामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीने उग्र रूप धारण केल्यामुळे नागरिक हैराण झाले असून या  दुर्गंधीमुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येबाबत येथील नागरिकांनी पालिका घनकचरा विभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यानुसार हा मुद्दा मुंबई महानगरपालिका स्थायी समिती च्या सभेमध्ये  राष्ट्रवादीच्या वतीने मांडण्यात आला होता.  त्यानुसार येथील दुर्गंधी नष्ट करण्याकरीता सी.एस.आय.आर. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान यांना दुर्गंध अटोक्यात आणण्याबाबतच्या अटी आणि शर्तीवर नियुक्ती करण्यात आली असून मुंबई महानगरपालिका मार्फत रू.2 कोटी निधीची तरतूद मंजूर करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळाले आहे.

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार कांजूर येथील भरावभूमी मुंबई महापालिका स्थलांतर करू शकत नाही. परंतू येथे वाढत चाललेल्या दुर्गंधीमुळे कांजूरमधील रहीवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील रहिवासी फूफ्फूसांच्या रोगांनी त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या या गंभीर समस्येची दखल घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस गटनेते, नगरसेवक धनंजय पिसाळ यांनी ही समस्या महापालिकेच्या निर्दशनात आणुन दिली असून सतत भरावभूमी मधून येणारी दुर्गंधी अटोक्यात आणण्याकरिता प्रशासनाने योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्याबाबत प्रस्ताव मांडला. हा  प्रस्ताव स्थायी समितीने मान्य करून कांजूर-भांडूप भरावभूमी येथील घनकचऱ्याची  शास्त्रोक्त पद्धतीने बायोरिऍक्टर तंत्रज्ञान वापरून विल्हेवाट लावण्याकरीता पर्यावरण मंजूरीनुसार चालविण्याकरीता आणि सतत येणारी दुर्गंधी नष्ट करण्याकरीता सी.एस.आय.आर. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान यांना दुर्गंधी अटोक्यात  आणण्याबाबतच्या अटी आणि शर्तीवर नियुक्ती करण्यात आली असून मुंबई महानगरपालिका मार्फत रू.2 कोटी निधीची तरतूद मंजूर करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळाले आहे. 

त्याकरिता  मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग आणि उपप्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) के. जे. चौधरी  यांच्यासमेवत स्थानिक नागरिकांसह कांजूरमार्ग भरावभूमी येथून येणारी दुर्गंधी रोखण्याबाबत चर्चा करण्यात आली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 110 च्या वतीने  च्या वतीने निवेदन देण्यात आले.  निवेदन देण्यापूर्वी कचरा उचलणाऱ्या सुमारे 44 गाड्या अडविण्यात आल्या आणि चालकांकडे चौकशी केली असता सर्व गाड्या अंधेरी/मालाड विभागातून आल्याचे निर्दशनात आले. त्यामुळे पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या मंजूरी नुसार दुर्गंधी रोखण्याचे काम आजच्या आज  सुरू करावे अन्यथा उद्या पासून कांजूरमार्ग भरावभूमी वर कचरा घेऊन येणाऱ्या गाड्या अडविण्यात येतील असा इशारा राष्ट्रवादी तर्फे यावेळी देण्यात आला. तर या चर्चेच्या वेळी उपस्थित असलेले महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाने दुर्गंधी रोखण्याबाबत आदेश संबंधीत कत्रांटदारास दिले असून  नागरिकांना यापुढे दुर्गंधी त्रास होणार नाही असे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले. यावेळी माजी खासदार संजय पाटील, नगरसेवक धनंजय पिसाळ, माजी नगरसेविका मनोरमा पाटील, माजी नगरसेविका भारती पिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages