गुमास्त्यासाठी लाच घेणार्‍या पालिका अधिकार्‍यासह दोघे अटकेत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गुमास्त्यासाठी लाच घेणार्‍या पालिका अधिकार्‍यासह दोघे अटकेत

Share This
मुंबई : घरात कपडे विक्री करण्याचा व्यवसाय करणार्‍याला गुमास्ता परवाना देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणार्‍या मनपा अधिकार्‍यासह दोघांना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी यांचे महिलांचे कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय त्यांना त्यांच्या राहत्या घरातूनच सुरू करावयाचा असल्याने व त्यांना व्यवसायाच्या नावाने बँक खाते उघडण्यासाठी गुमास्ता परवाना हवा होता. त्यासाठी फिर्यादींनी मनपाच्या जी/उत्तर विभाग, दादर येथे रीतसर अर्ज करून ६८0 रुपये शुल्क भरले होते. त्याअनुषंगाने जी/उत्तर विभाग, दादर कार्यालयाचे गुमास्ता निरीक्षक सुनील विश्‍वनाथ येवला (५१) यांनी परवाना देण्यासाठी कायदेशीर शुल्काखेरीज ५ हजारांच्या लाचेची मागणी केली. फिर्यादींना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी एसीबीकडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) तक्रार दाखल केली. त्यानुसार बुधवारी जी/उत्तर विभाग, दादर मनपा कार्यालयात सापळा लावून रामचंद्र नारायणकर याने गुमास्ता निरीक्षक याच्याकरिता दोन हजारांची लाच स्वीकारल्याचे उघड झाल्यानंतर दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages