मुंबईकरांवर एक ऑक्टोबर पासून 30 टक्के पाणी कपात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईकरांवर एक ऑक्टोबर पासून 30 टक्के पाणी कपात

Share This
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात यंदा आत्तापर्यंत झालेल्या कमी पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी 29 टक्के कमी पाणीसाठा कमी आहे त्यामुळे मुंबई समोर अद्याप पाणी संकट कायम आहे  सद्या सुरु असलेल्या 20 टक्के पाणी कपातीत 10 टक्के वाढ करण्याचा विचार पालिकेने सुरु केला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणार्या तलावाच्या पातळीत सप्टेंबर महिन्यात समाधानकारक वाढ न होताच पावसाने एक महिन्या अगोदरच पळ काढल्याने पालिका प्रशासन चांगलीच धर-तावली आहे पालिकेकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने मुंबई करांवर एक ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईच्या पाणी पुरवठ्यात एकूण 30 टक्के कपात करण्याचा विचार केला आहे त्यामुळे मुंबईकरांना ऐन दिवाळीच्या कालावधीत मोठा पाणी कपातीचा सामना.करावा लागणार आहे हे जवळजवळ निश्चित झाले आहे

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये गेल्यावर्षी 14 लाख 27 हजार 526 दशलक्ष लिटर पाणी साठा होता. सध्या या धरणांमध्ये 9 लाख 86 हजार 822 दश लक्ष लिटर पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा मुंबईसमोर गंभीर पाणी संकट उभे आहे त्यामुळे मुंबईकरांना वषॅभर पाणी पुरवठा व्हावा यासाठी.पालिकेने 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून शहरात 20 टक्के पाणीकपात लागू केली आहे. तर तरण तलाव, मॉल्स, तारांकित हॉटेल्स, बाटलीबंद पाण्याचे कारखाने, रेसकोर्स आदींच्या पाणीपुरवठय़ात 50 टक्क्यांनी कपात करण्यात आली मात्र पावसाने एक महिन्या अगोदरच पळ काढल्याने पालिका प्रशासन चांगलीच धर-तावली आहे पालिकेकडे दुसरा पर्याय नसल्याने आणि मुंबईकरांना वषॅभर पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने आणखीन 10 टक्के पाणीकपातीत वाढ करून एकूण 30 टक्के पाणीकपात एक ऑक्टोबर पासून करण्याचा विचार केला आहे  तसेच सध्या डोंगर भागांमध्ये पाण्याची आणीबाणी निर्माण झाली आहे  डोंगरभागांमधील वस्त्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक त्रस्त असून विहिरी व कूपनलिका दुरुस्त करून त्या ताब्यात घेऊन त्यातून या पाण्याचा पुरवठा या भागांमध्ये पिण्याव्यतिरिक्त वापरण्याचा विचार  पालिका प्रशासन करत आहे.ऐन दिवाळीच्या कालावधीत मुंबईकरांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागणार आहे या कपाती बरोबरच मुंबईकरांना कसे पाणी देता येईल याचा ही विचार पालिका करत आहे 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages