नालेसफाईचे टेंडर रद्द क़रा, कंत्राटदारावर गुन्हे दाखल क़रा - देवेन्द्र आंबेरकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नालेसफाईचे टेंडर रद्द क़रा, कंत्राटदारावर गुन्हे दाखल क़रा - देवेन्द्र आंबेरकर

Share This
मुंबई । प्रतिनिधी
19 जूनला झालेल्या मुसळधार पावसात मुंबई पाण्यात डुबली होती. याबाबत पालिकेने नियुक्त केलेल्या चौकशी समिती मधे कंत्राटदार दोषी ठरले आहेत. या भ्रष्टाचाराची दखल घेवुन पालिका आयुक्तानी दोषी कंत्राटदारावार फौजदारी गुन्हा दाखल करावा व जुने टेंडर रद्द करून नव्याने टेंडर प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी देवेन्द्र आंबेरकर यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे पत्रा द्वारे केली आहे.

नालेसफाईच्या कामाच्या चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे.या चौकशीत नालेसफाईची सर्वच यंत्रणा संशयाच्या जाळ्यात अडकली आहे. निविदेतील अटी शर्तिचे पालन कंत्राटदार व प्रशासनाने केले नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. कंत्राटदारानी महानगरपालिकेची फसवणुक केली आहे. 54 पैकी फ़क्त 9 कंत्राटदारांच्या कामांची चौकशी करून हां अहवाल सादर केला आहे. सर्वच कंत्राटदारांची चौकशी करून दोषी कंत्राटदारावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंबेरकर यांनी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages