मराठवाड्यातील बुद्धीस्ट पर्यटनाला िमळणार गती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मराठवाड्यातील बुद्धीस्ट पर्यटनाला िमळणार गती

Share This
अजिंठा-वेरुळसाठी जपान करणार भरीव मदत
मुख्यमंत्री ७ सप्टेंबरपासून जपानच्या दौऱ्यावर
मुंबई /
जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट असलेल्या मराठवाड्यातील जगप्रसिद्घ् अजिंठा, वेरुळ लेण्यांकडे बौद्ध पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन िवकास महामंडळाने मोठी मोहीम आखली असून राज्य सरकार आिण जपान यांच्यात ११ सप्टेंबर रोजी ह्यजायका टप्पा-३ह्णसाठी अत्यंत महत्वाचा असा सामंजस्य करार होत आहे.

जपानमधील गुंतवणूकदार आिण पर्यटक यांना आकर्षित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  ७ सप्टेंबर पासून जपानच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामध्ये जपान इंटरनॅशनल को. आॅप. एजन्सी (जेआयसीए) आिण महाराष्ट्र पर्यटन िवकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्यात जायका -३ या टप्प्यासाठी सामंजस्य करार होणार आहे. यापूर्वी जायका टप्पा १ आिण टप्पा २ पूर्ण झाले असून त्यामधून अजिंठा आिण वेरुळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यागत कक्षांची आिण पर्यटक केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.

जायका टप्पा-३ मध्ये अिजंठा आिण वेरुळ येथे  पायाभूत सुिवधा िनर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्व आिण आग्नेय देशातील बौद्ध पर्यटक अिजंठा, वेरुळला भेट देण्याचे प्रमाण वाढणार असून एकंदर मराठवाड्यातील पर्यटनाला सुगीचे िदवस येणार आहेत.

जायका टप्पा -३ मध्ये अजिंठा, वेरुळ परिसरातील रस्ते सुधारणांवर भर देण्यात आलाआहे. तसेच अिजंठा लेण्याजवळील तीनशे एकर जागेचा िवकास करण्याचेही या करारांमध्ये नियोजन आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन िवकास महामंडळाचे सहसंचालक सतीश सोनी यांनी ह्यिदव्य मराठीह्णला िदली.

जपानची ह्यजायकाह्ण कंपनी राज्यातील बौद्ध पर्यटन स्थळांच्या िवकासासाठी उत्सुक आहे. नागपूर येथील ज्या ऐतिहासीक मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये बौद्ध धर्माची िदक्षा घेतली त्या दिक्षाभूमीच्या िवकासाला भरीव निधी देण्याची जायकाने तयारी दाखवली आहे.

१. जपानच्या पर्यटकांना महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ, दीभाभूमी आदी बौद्ध पर्यटन स्थळाची माहिती व्हावी, या हेतूने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने टोकियो शहरात रोड शो ठेवण्यात आला आहे.

२. वाकायामा राज्यातील कोयसाना विद्यापीठ आणि औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यात बुध्दीस्ट रिसर्च स्टडीज संदर्भात यावेळी सामंजस्य करार होणार आहे. 

३. वाकायामा राज्यातील कोयसाना िवद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होईल. महाराष्ट्राच्या सामािजक न्याय िवभागाने आंबेडकरांचा पुतळा िवद्यापीठास भेट िदला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages