कॉ. पानसरेंच्या हत्येच्या कटात मुख्यमंत्री सहभागी - मुश्रीफ, कोळसे-पाटील यांचा आरोप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कॉ. पानसरेंच्या हत्येच्या कटात मुख्यमंत्री सहभागी - मुश्रीफ, कोळसे-पाटील यांचा आरोप

Share This
माजी पोलीस आयुक्त शमशुद्दीन मुश्रीफ,माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांचा आरोप
कोल्हापूर / 21 Sep 2015 - कॉ.पानसरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर योग्य उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत असताना २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांना विनाकारण मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. हे प्रकरण अगदी संशयास्पद असल्याने पानसरे यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या हत्त्येच्या कटात सहभागी होते. हा कट अत्यंत वरच्या पातळीवर शिजला आणि त्याचे सूत्रधार स्वतः मुख्यमंत्री होते असा सणसणीत आरोप करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी पोलीस आयुक्त शमशुद्दीन मुश्रीफ, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

मुख्यमंत्र्यांनी पानसरे यांना मुंबईला नेण्यासाठी इतकी तत्परता का दाखवली ? पानसरे हे शासनाच्या लेखी इतके महत्वाचे व्यक्ती होते का? पानसरे यांच्या मृत्यूपूर्वी आणि नंतरचा घटनाक्रम पाहिला तर याचे उत्तर नाही असेच येते असे सांगून मुख्यमंत्री १७ फेब्रुवारी रोजी तासगावला आले होते. त्यावेळी पानसरे यांच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मुख्यमंत्री नक्कीच पानसरे यांची विचारपूस करण्यासाठी कोल्हापुरात आले असते. तसेच पानसरे यांचा अंत्यविधी शासकीय इतमामाने झाला असता. किंवा शासनाचा एखादा प्रतिनिधी अंत्यविधीसाठी हजर राहिला असता. मात्र तसे काहीच झाले नाही. याचा अर्थ पानसरे शासनाच्या दृष्टीने फारशी महत्वाची व्यक्ती नव्हती. मग त्यांना मुंबईला नेण्याचा आटापिटा का ?त्यामुळे एकंदरीत घटनाक्रमावरून हे एक मोठे षड्यंत्र होते आणि यामागे मुख्यमंत्री सूत्रधार होते. आणि अशारितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संशयाच्या भोवऱ्यात येत असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा आणि ते हट्टाने आपल्या पदाशी चिकटून राहणार असतील तर पानसरे यांच्या हत्त्येचा तपास हायकोर्टाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली होणे किंवा सीबीआय, एन.आय.ए.सारख्या केंद्रीय तपास यंत्रणाद्वारे व्हावा असे मुश्रीफ आणि कोळसे-पाटील यांनी सांगितले.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेला सनातनचा साधक काहीच माहिती देत नसून तपास यंत्रणेला सहकार्य करत नसल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, तसे असेल तर त्याची नार्को अनालेसीस टेस्ट का करत नाही ? यापूर्वी ही एटीएस ने एका महीन्यातच दोनवेळा पानसरे हत्येचा गुन्हा उघडकीला आणला होता, पोलीस त्याचवेळी आरोपी पर्यंत पोहचले होते.मात्र त्यावेळी त्याला अटक न करता चौकशी करून सोडून देण्यात आले.मात्र या दरम्यान कर्नाटकात डॉ.कलबुर्गी यांची ही हत्या झाली आणि कर्नाटक सरकारने आणि कर्नाटक पोलिसांनी हा प्रश्न प्रतिष्टेचा केला आणि तपास सीबीआय कडे सोपवला, कर्नाटक पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला तर आपली नाचक्की होईल या भीतीने राज्य सरकारने पोलिसांना तात्काळ सनातनच्या साधकाला म्हणजेच आरोपी समीर गायकवाड याला ताबडतोब अटक करण्याचे आदेश दिले असा आरोप ही यावेळी मुश्रीफ आणि न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांनी केला. तसेच सनातन संस्थेवर कायमची बंदी घालण्याची मागणी करत राज्यसरकार पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासकामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप यावेळी या दोन निवृत्त जबाबदार अधिकाऱ्यांनी केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages