वीज दरवाढीचा जाहिर निषेध - संजय निरुपम... - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वीज दरवाढीचा जाहिर निषेध - संजय निरुपम...

Share This
सरकार विजेचे दर कमी झाल्याचा दावा करत असताना मुंबईत रिलायन्स, टाटा, एमएसईबी आणि बेस्टची भरमसाठ बिले. मुंबईतील सर्वसामान्य लोकांमध्ये संताप निर्माण झालाय याकरिता मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात बुधवार दि. २ सप्टेंबर, २०१५ व गुरुवार दि. ३ सप्टेंबर, २०१५ रोजी बेस्ट, रिलायन्स, टाटा व एमएसईबी या वीज कंपन्यांनी केलेल्या भरमसाठ वीज दरवाढीचा जाहिर निषेध करण्याकरिता कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आप - आपल्या विभागात घरोघरी जाऊन निषेध पत्रकाचे वाटप, वीज बिलाच्या प्रती व निषेध पत्रकावर स्वाक्षरी मोहिम घेण्यात येणार आहे.
   
वीज दरवाढीचा जाहिर निषेध  कार्यक्रमात मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, AICC सरचिटणीस गुरुदास कामत, AICC सचिव प्रिया दत्त, माजी खासदार एकनाथ गायकवाड, मिलिंद देवरा, आमदार नसीम खान, वर्षाताई गायकवाड, असलम शेख, अमिन पटेल, कालिदास कोळंबकर, भाई जगताप, मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह, प्रो. जनार्दन चांदूरकर, मुंबई महिला कॉंग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे, सर्वश्री माजी आमदार व सर्वश्री नगरसेवक / नगरसेविका, जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, महिला कॉंग्रेस, युथ कॉंग्रेस, एनएसयुआय आणि कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत...

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages