मुंबई / मुकेश श्रीकृष्ण धावडे
मुलुंड पूर्व गवाणपाडा कोळीवाडा येथील परिसरात राहणारे आगरी - कोळी समाजातील महिला वर्ग गेली 40 वर्षे मासे विक्री व्यवसाय गवाणपाडा येथील 90 फुटी रस्त्यावर करित आहेत. या व्यवसायावर आधारित त्यांच्या कुटुंबियांचा उदार निर्वाह आहे. मात्र गेल्या वर्षाभरापासून जागेची मोठी अडचण या मासे विक्रेत्य़ांना भासू लागली आहे. त्यात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची सततची होत असलेली कारवाई यामुळे येथील मासे विक्रिते त्रस्त झाले असल्याने गवाणपाडा मासे विक्रेता संघ यांनी ही बाब स्थानिक नगरसेवक नंदकूमार वैती यांच्या निर्दशनात आणून दिली. त्यानुसार वैती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापालिका गटनेते धनंजय पिसाळ यांनी महापालिका उपायुक्त (बाजार) यांच्याशी चर्चा करून तत्काळ या समस्येचे निवारण करण्यात यावे यासाठी लेखी निवेदनही दिले.
मुलुंड येथील गवाणपाडा परिसरात राहणारे आगरी - कोळी बांधव यांची जन्म आणि कर्म भूमी हीच असल्याचे या बांधवांचे म्हणणे असून गेली 40 वर्षांपासून मासे विक्री करून कुटुंबियांचा उदार निर्वाह चालवत आहोत. मात्र गेल्या वर्षभरापासून मासे विक्रेत्यांना जागेची मोठी अडचण येथे भासू लागली आहे. त्यात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची सततची होत असलेली कारवाई यामुळे मासे विक्रीसाठी येथे बसने शक्य होत नाही. परिणामी मासे खराब होतात व मासे विक्रेत्यांचे मोठे नुकसान होते. बऱ्याचदा मासे व्यवसायक मासे खराब होण्यापेक्षा फेरीवाल्यांप्रमाणे दारोदारी जावून विकतात. पण 40 वर्षांपासून करीत असलेल्या मासे विक्रीवर ही गैर कारवाई का? असा सवाल येथील मासे विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत असल्याने गवाणपाडा मासे विक्रेता संघ यांनी ही बाब स्थानिक नगरसेवक नंदकूमार वैती यांच्या निर्दशनात आणून दिली. त्यानुसार वैती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापालिका गटनेते धनंजय पिसाळ यांनी महापालिका उपायुक्त (बाजार) यांच्याशी चर्चा करून तत्काळ या समस्यचे निवारण करण्यात यावे यासाठी लेखी निवेदनही दिले. त्यानुसार गवाणपाडा येथे (ता. 5) रोजी महापालिका उपायुक्त (बाजार) बी .जी.पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापालिका गटनेते पिसाळ व नगरसेवक नंदकूमार वैती आणि गवाणपाडा मासे विक्री संघ समवेतचर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये गवाणपाडा मासे विक्री संघ यांच्या आणि प्रतिनिधींच्या निवेदना नुसार 90 फुटी मार्गावरील घनकचरा चौकी असलेल्या जागेवर मासे विक्रेत्यांना स्थलांतर करून पुर्नवसन करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या मागणीला महापालिका उपायुक्त (बाजार) बी .जी.पवार यांनी मान्यता दिली असून याकरिता रितसर महापालिका मंजूरी देण्याचे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले.
